मुंबई : सेल्फीसाठी परदेशी महिलेच्या मागे लागले... तिने नकार देताच तरुणांचं 'ते' कृत्य!
मुंबईच्या महालक्ष्मी परिसरात एका परदेशी महिला पर्यटकाने काही तरुणांवर विनयभंगाचा आरोप केल्याचं वृत्त समोर आलं आहे. संबंधित महिलेने या घटनेचा एक व्हिडीओ सुद्धा शेअर केल्याचं सांगितलं जात आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सेल्फीसाठी परदेशी महिलेच्या मागे लागले...
तिने नकार देताच तरुणांचं 'ते' कृत्य!
मुंबईतील संतापजनक घटना
Mumbai News: मुंबईच्या महालक्ष्मी परिसरात एका परदेशी महिला पर्यटकाने काही तरुणांवर विनयभंगाचा आरोप केल्याचं वृत्त समोर आलं आहे. संबंधित महिलेने या घटनेचा एक व्हिडीओ सुद्धा शेअर केल्याचं सांगितलं जात आहे. व्हिडिओमध्ये, दोन तरुण 15 मिनिटांपेक्षा जास्त काळ महिलेचा पाठलाग करताना दिसत आहेत आणि तिने नकार देऊन सुद्धा तिला वारंवार सेल्फी घेण्यास सांगत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसून येत आहे.
महिलेने इंस्टाग्राम पोस्टवर काय म्हटलं?
इनेस फारिया असं पीडित महिलेचं नाव समोर आलं असून तिने आपल्या इंस्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करताना तिच्या भारतातील वास्तव्यादरम्यान ही घटना घडल्याचं तिने म्हटलं आहे. तसेच, भारतात पहिल्यांदाच तिच्यासोबत ही घटना घडल्याचं ती म्हणाली. याबाबत इंस्टाग्रामवर पोस्ट करताना ती म्हणाली की, गेल्या दोन महिन्यांपासून मी भारतात आहे. भारतात माझे बहुतेक अनुभव सुंदर आणि स्वागतार्ह राहिले आहेत. पण हा दिवस वेगळा होता." इंस्टग्रामवरील तिच्या पोस्टनुसार, तरुणांचा एक ग्रुप तिच्यासह तिच्या साथीदाराचा पाठलाग करत होता आणि तिने नकार देऊनही वारंवार त्यांच्या फोटोंची मागणी करत होता.
हे ही वाचा: मुंबईची खबर : मुंबईकरांनो लक्ष द्या! 1 मार्चपासून बेस्ट (BEST) बस सेवेत मोठे बदल...
"ते आमच्यावर दबाव टाकत होते..."
संबंधित महिला पर्यटकाने याबाबत म्हटलं की, मी सतत नकार देऊन सुद्धा ती मुले आमचा पाठलाग करत होती आणि आमच्यासोबत फोटोंची मागणी करत होती. मला अजिबात कम्फर्टेबल वाटत नव्हतं आणि ते आमच्यावर दबाव टाकत असल्याचं त्या महिलेने सांगितलं. तिने पुढे लिहिलं की ते 15 मिनिटांपेक्षा जास्त काळ ते आमचा पाठलाग करत होते आणि मग अशी वेळ आली की, जागा बनवण्यासाठी तिला त्यांना दूर ढकलून द्यावं लागलं, असं तिने पुढे म्हटलं. संमती आणि वैयक्तिक सुरक्षिततेचे महत्त्व अधोरेखित करताना तिने लिहिलं, "फक्त एक आठवण करून देत आहे की 'नाही' हे एक पूर्ण वाक्य आहे." त्या महिलेने पुढे म्हटले की तुमची सुरक्षितता आणि कम्फर्टला नेहमीच प्राधान्य द्यायला हवं.










