Maharashtra Weather : मार्च महिन्याच्या पहिल्या दिवशी हवामानाचा महत्त्वाचा अलर्ट, उष्णतेचा पारा वाढणार तर...
Maharashtra Weather : राज्यात फेब्रुवारी महिन्यात उष्णतेचा पारा वाढलेला आहे. मार्च महिन्यात देखील पारा आणखी वाढण्याची शक्यता आहे. राज्यात कमाल तापमान हे 2-4 अंशांनी वाढून हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. दरम्यान 1 मार्च रोजी मुख्यत्वे कोरडे, उष्ण आणि निरभ्र राहील अशी हवामान खात्याने शक्यता वर्तवली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राज्यात फेब्रुवारी महिन्यात उष्णतेचा पारा वाढला
मार्च महिन्याची स्थिती काय?
Maharashtra Weather : राज्यात फेब्रुवारी महिन्यात उष्णतेचा पारा वाढला आहे. मार्च महिन्यात देखील पारा आणखी वाढण्याची शक्यता आहे. राज्यात कमाल तापमान हे 2-4 अंशांनी वाढून हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. दरम्यान 1 मार्च रोजी मुख्यत्वे कोरडे, उष्ण आणि निरभ्र राहील अशी हवामान खात्याने शक्यता वर्तवली.
हे ही वाचा : अजितदादांच्या विमान अपघाताप्रकरणी AAIB चा महत्त्वाचा अहवाल आला समोर, नेमकं काय घडलं?
कोकण :
कोकण विभागातील मुंबई,ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात हवामान उष्ण आणि दमट कायम राहील असा अंदाज आहे. मुंबई शहराचा विचार केल्यास कमाल तापमान हे 29-32 अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे. तर किमान तापमान हे 23-25 अंश राहण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्र :
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर येथे हवामान उष्ण आणि कोरडं राहण्याची शक्यता आहे. तसेच पुणे शहरात देखील अशी स्थिती जाणवेल.
मराठवाडा :
मराठवाडा विभागातील बीड, लातूर, नांदेड, परभणी आणि धाराशिवमध्ये हवामान उष्ण आणि कोरडं राहण्याची अधिक शक्यता आहे.










