जळगाव : प्रेम संबंधातून विवाहितेच्या डोक्यात गोळी घालून स्वतःलाही संपवलं, मुलीनं दार उघडून पाहताच...

मुंबई तक

Jalgaon news : जळगावातील चोपडा तालुक्यात एका विवाहितेवर शिरपूर तालुक्यातील तरुणाने घरात घुसून तिच्या डोक्यावर गावठी कट्ट्याने गोळी झाडली. यानंतर त्याने स्वत:वर देखील गोळीबार करत आत्महत्या केली. या घटनेनं जळगावात हळहळ व्यक्त केली जात आहे. गोळीबार केलेल्या तरुणाचे नाव देवा धनगर असे आहे. 

ADVERTISEMENT

Jalgaon news
Jalgaon news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पुरुषाने 40 वर्षीय महिलेवर गोळीबार करत स्वत:लाही संपवलं

point

प्रेमसंबंधातून घडली घटना

Jalgaon News : मनीष जोग -  जळगावातील चोपडा तालुक्यात एका विवाहितेवर शिरपूर तालुक्यातील तरुणाने घरात घुसून तिच्या डोक्यावर गावठी कट्ट्याने गोळी झाडली. यानंतर त्याने स्वत:वर देखील गोळीबार करत आत्महत्या केली. या घटनेनं जळगावात हळहळ व्यक्त केली जात आहे. गोळीबार केलेल्या तरुणाचे नाव देवा धनगर असे आहे. 

हे ही वाचा : गडचिरोलीत बँकेची संवेदनशून्यता, कोमातील वृद्धेला न्यावे लागले थेट बँकेत; शाखा व्यवस्थापकाचा आडमुठेपणा

पुरुषाने 40 वर्षीय महिलेवर गोळीबार करत स्वत:लाही संपवलं

घडलेल्या घटनेनुसार, चोपडा तालुक्यातील अक्कलखेडा गावात 40 वर्षीय महिला पती आणि दोन मुलांसोबत राहत होती. सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास विवाहितेची मुलगी शाळेतून घरी आली. तिने दरवाजा उघडताच रक्ताने माखलेल्या स्वरुपात दोघांना देखील पाहिलं, हे चित्र बघून तिच्या पायाखालची जमीन सरकली. 

संबंधित घटनेची माहिती समजताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. या प्रकरणी पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप पोलीस निरीक्षक मधुकर साळवे व इतर अधिकारी फॉरेन्सिक व्हॅनसह घटनास्थळी दाखल झाले. दोघांनाही उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हे ही वाचा : महिलेने रागाच्या भरात लिव्ह इन पार्टरनला ड्रग्ज देऊन त्याचे गुप्तांग कापले, नंतर घटनास्थळावरून काढला पळ

प्रेमसंबंधातून घडली घटना

पोलिसांनी उपविभागीय अधिकारी अण्णसाहेब घोलप यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी सांगितलं ही घटना शिरपूर तालुक्यात घडली. दोघांचे प्रेमसंबंध असल्याची माहिती आहे. संपूर्ण तपासातून इतर काही खरी माहिती समोर येईल. 

हे वाचलं का?

    follow whatsapp