'मी तुमचं स्वप्न पूर्ण करु शकले नाही..' पोलिस भरतीतील अपयशाने 26 वर्षीय तरुणीची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये काय लिहिलं?
Ambernath Suicide News : अंबरनाथ परिसरात राहणाऱ्या एका तरुणीने पोलिस दलात भरती होण्याचं स्वप्न पाहिलं होतं. आपल्या आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द तिनं उराशी बाळगली होती. मात्र सततच्या अपयशाला कंटाळून तिने आपले जीवन संपवले आहे. प्रतीक्षा राणे असं या 26 वर्षीय तरुणीचं नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'मी तुमचं स्वप्न पूर्ण करु शकले नाही..
पोलिस भरतीतील अपयशाने २६ वर्षीय तरुणीची आत्महत्या
सुसाईड नोटमध्ये काय लिहिलं?
Ambernath Suicide News : सरकारी नोकरी मिळवण्याची स्पर्धा सध्या जीवघेणी झाली आहे. देशातील वाढती बेरोजगारी हे त्यामागचं कारण. या स्पर्धेत सर्वांनाच यश मिळेल असं नाही. ज्यांना यश मिळत नाही ते तरुण नैराश्यात बुडालेले असतात. यामुळे काही जणांनी टोकाचं पाऊल उचलल्याच्या घटना आपण वाचत, ऐकत असतो. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अंबरनाथ परिसरात राहणाऱ्या एका तरुणीने पोलिस दलात भरती होण्याचं स्वप्न पाहिलं होतं. आपल्या आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द तिनं उराशी बाळगली होती. मात्र सततच्या अपयशाला कंटाळून तिने आपले जीवन संपवले आहे. प्रतीक्षा राणे असं या 26 वर्षीय तरुणीचं नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
हे ही वाचा : नवी मुंबई: मॅट्रिमोनिअल साइटवर महिलांशी ओळख, नंतर लैंगिक शोषण अन् पैसे सुद्धा उकळले! पोलिसांनी केला पर्दाफाश
राहत्या घरात आढळला मृतदेह
अंबरनाथ (पश्चिम) येथील स्वामीनगर भागात प्रतीक्षा राणे आपल्या कुटुंबासह राहत होती. गेल्या अनेक वर्षांपासून ती पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत होती. मात्र, वारंवार प्रयत्न करूनही यश मिळत नसल्याने ती नैराश्यात होती. 26 फेब्रुवारी रोजी प्रतीक्षाचा मृतदेह तिच्या राहत्या घरात आढळून आला.
'आई-बाबा मला माफ करा...'
घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा केला असता, त्यांना प्रतीक्षाने लिहिलेली एक सुसाईड नोट सापडली आहे. 'तुम्ही ज्या आयुष्याचं स्वप्न बघितलं होतं ते मी पूर्ण करुन शकले नाही, मला माफ करा,' असे भावनिक शब्द तिने या पत्रात लिहिले आहेत. आई-वडिलांना चांगले जीवन देण्याचे स्वप्न भंगल्याच्या दुःखातून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.










