पाणीपुरीत विष टाकूत गर्भवतीला मारण्याचा कट, नंतर जंगलात नेलं अन्... हादरवून टाकणारी घटना

मुंबई तक

crime news : प्रियकराने आपल्या गर्भवती प्रेयसीला पाणी पुरीत विष देऊन मारण्याचा कट रचला. प्रेयसीला वेळीच कटाचा संशय आल्याने तिने आपला जीव वाचवला. याच प्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रियकर केशरीच्या मुसक्या आवळल्या आहेत. 

ADVERTISEMENT

crime news
crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी अनेकदा शरीरसंबंध

point

महिलेनं पाणीपुरी खाण्याची व्यक्त केली इच्छा, पण घडलं भलतंच

Crime News : झारखंडमधील गढवा जिल्ह्यातील रामकांडा पोलीस ठाणे परिसरातून एक खळबळजनक घटना उघडकीस आली. प्रियकराने आपल्या गर्भवती प्रेयसीला पाणी पुरीत विष देऊन मारण्याचा कट रचला. प्रेयसीला वेळीच कटाचा संशय आल्याने तिने आपला जीव वाचवला. याच प्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रियकर केशरीच्या मुसक्या आवळल्या आहेत. 

हे ही वाचा : नागपूर : 8 वर्षांच्या लेकीला बाप दाखवायचा पोर्न, नंतर नको तेच... कोणाला सांगितल्यास द्यायचा 'ती' धमकी

लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी अनेकदा शरीरसंबंध

पोलिसांनी दिलेल्या संबंधित अर्जात पीडितेनं म्हटलं की, आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी अनेकदा शरीरसंबंध ठेवले होते. सुमारे सहा वर्षांपासून प्रेमसंबंधात होते. एका वर्षांपूर्वी त्यांना एक मूल झाले होते. गाव आणि समाजाने त्यांच्या नात्याला नाकारले आणि दोघांचे देखील बोलणं बंद झाले. 

काही महिन्यानंतर आरोपीने पुन्हा महिलेशी संपर्क साधला आणि लग्नाचे आश्वासन देत तिच्याशी लैंगिक संबंध ठेवले. असा आरोप आहे. दरम्यान, संबंधित महिला ही पुन्हा गर्भवती राहिली होती. महिला आता आठ महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले जात आहे. संबंधित प्रकरणात महिलेनं आरोप केला की, आरोपीने तिला फसवले आणि नंतर तिला सोडून देण्याचा कट देखील रचला होता. 

महिलेनं पाणीपुरी खाण्याची व्यक्त केली इच्छा 

पीडितेच्या म्हणण्यांनुसार, 21 फेब्रुवारी रोजी दुपारी 2:00 वाजता आरोपीने तिला फोन करून काही तरी खाण्याबाबत सांगितले. त्यानंतर महिलेनं पाणीपुरी खावीशी वाटत असल्याची इच्छा व्यक्त केली. आरोपीने महिलेला पाणी पुरी खाऊ घातली होती, ज्यामुळे महिलेची प्रकृती बिघडली. नंतर तिला उलटी आल्यासारखं वाटू लागलं. तिच्या तोंडातून रक्तस्त्राव होऊ लागला होता. 

हे वाचलं का?

    follow whatsapp