किरकोळ कारणावरून मित्रांमध्ये वाद! रागाच्या भरात तरुणाने थेट दगड डोक्यात घातला अन् नाल्यात फेकून...
वृत्तानुसार, केवळ 1500 रुपयांवरून झालेल्या किरकोळ वादातून तरुणाने आपल्या मित्राची निर्घृणपणे हत्या केली. नेमकं काय घडलं? सविस्तर जाणून घ्या.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
किरकोळ कारणावरून मित्रांमध्ये वाद!
तरुणाने थेट दगड डोक्यात घातला अन् नाल्यात फेकून...
Crime News: दिल्लीच्या नोएडा फेज-3 परिसरातून एक भयानक हत्येचं प्रकरण समोर आलं आहे. येथील सेक्टर-64 मध्ये घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाल्याचं सांगण्यात येत आहे. वृत्तानुसार, केवळ 1500 रुपयांवरून झालेल्या किरकोळ वादातून तरुणाने आपल्या मित्राची निर्घृणपणे हत्या केली. नेमकं काय घडलं? सविस्तर जाणून घ्या.
किरकोळ वादातून मित्राची निर्घृण हत्या...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल (35) अशी मृत तरुणाची ओळख समोर आली आली असून आरोपीचं नाव रविंद्र असल्याची माहिती आहे. दोघेही एकत्र फुटपाथवर राहत होते आणि एकमेकांचे चांगले मित्र होते. गुरुवारी सकाळी जवळपास 9 वाजताच्या सुमारास त्या दोघांमध्ये 1500 रुपयांवरून वाद सुरू झाला. मात्र, किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद इतका टोकाला पोहोचला की या भांडणात आरोपी रविंद्रने अचानक राहुलच्या डोक्यावर मोठ्या दगडाने वार केला. या हल्ल्यात पीडित तरुण गंभीररित्या जखमी झाला आणि आरोपी रविंद्रने एवढ्यावरच न थांबता राहुलला धक्का मारून जवळच्या नाल्यात फेकून दिलं. यामुळे, पीडित राहुलचा मृत्यू झाला.
हे ही वाचा: Govt Job: सरकारी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! IBPS कडून मोठी भरती; 17 लाखांचं पॅकेज अन्...
पोलिसांनी दिली माहिती
परिसरातील स्थानिकांना नाल्यात मृतदेह आढळल्यानंतर, त्याची पोलिसांना तातडीने सूचना दिली. त्यानंतर, पोलीस आणि फॉरेन्सिक टीम तातडीने घटनास्थळी पोहोचली. मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. याप्रकरणी, आरोपी तरुण रविंद्रला घटनास्थळावरून अटक केल्याचं सांगितलं जात आहे.
हे ही वाचा: 'मी नक्कीच दादांबरोबर...' अजित पवारांसाठी मनसे मैदानात उतरणार? राज ठाकरे आणि रोहित पवार यांच्या भेटीत काय घडलं?
पोलिसांनी या प्रकरणाबाबत माहिती देताना सांगितलं की, 1500 रुपयांवरून झालेल्या किरकोळ वादाचं हत्येत रूपांतर झालं. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास केला जात असून घटनास्थळावरून देखील महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यात आले आहेत. याशिवाय, पोलीस आणि तर प्रत्यक्षदर्शींचे जबाब देखील नोंदवले जात आहेत.










