Govt Job: सरकारी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! IBPS कडून मोठी भरती; 17 लाखांचं पॅकेज अन्...

मुंबई तक

इंस्टीट्यूट ऑफ बँकिग पर्सोनल सिलेक्शन (IBPS) कडून डेप्युटी मॅनेजर (एआई अॅप्लिकेशन डेव्हलपर) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) चं शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

ADVERTISEMENT

IBPS कडून मोठी भरती
IBPS कडून मोठी भरती
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सरकारी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी!

point

IBPS कडून मोठी भरती; 17 लाखांचं पॅकेज अन्...

Govt Job: सरकारी बँकेत नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी नव्या भरतीची बातमी समोर आली आहे. इंस्टीट्यूट ऑफ बँकिग पर्सोनल सिलेक्शन (IBPS) कडून डेप्युटी मॅनेजर (एआई अॅप्लिकेशन डेव्हलपर) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) चं शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवार www.ibps.in या IBPS च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. 

IBPS अंतर्गत केली जाणारी डेप्युटी मॅनेजर पदाची ही भरती रेग्युलर बेसवर केली जाणार आहे. ऑनलाइन परीक्षा, स्किल टेस्ट, ग्रुप एक्साइझ आणि पर्सनल इंटरव्ह्यू या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाईल. या भरतीच्या माध्यमातून निवड झालेल्या उमेदवारांची मुंबई शहरात पोस्टिंग केली जाणार असल्याची माहिती आहे. अशातच, या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण करा. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 1000 रुपये शुल्क भरावं लागेल. 

पात्रता आणि वयोमर्यादा   

IBPS च्या या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून (कंप्यूटर सायन्स/ आर्टिफिशियल इंटेलिजन्स/ डेटा सायन्स/ मशीन लर्निंग)/ एमसीए/ एमएससी कंप्यूटर सायन्स अशा क्षेत्रांत डिग्री असणं आवश्यक आहे. तसेच, या भरतीसाठी कंप्यूटर सायन्स/ आर्टिफिशियल इंटेलिजेन्स/ डेटा सायन्स/ मशीन लर्निंग मध्ये एम.टेक किंवा त्याहून अधिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. याशिवाय, पायथॉन, जनरेटिव्ह एआय, एलएलएम, एआय मॉडेल क्रिएशन, मशीन लर्निंग इत्यादी क्षेत्रांत एआय डेव्हलपमेंटचा 3 वर्षांचा अनुभव असणं अनिवार्य आहे. 

या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 23 वर्षे आणि कमाल वय 30 वर्षे अशी उमेदवारांसाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. यासोबतच, उमेदवारांना पायथॉन, SQI आणि डेटाबेस स्कीमा डिझाइन MySQL, SQL सर्व्हर, PostgreSQL यांचं उत्तम ज्ञान असणं गरजेचं आहे. या भरतीच्या माध्यमातून नियुक्त झालेल्या उमेदवारांना सुमारे 17.15 लाख रुपये वार्षिक पॅकेज मिळेल. 

हे वाचलं का?

    follow whatsapp