'मी नक्कीच दादांबरोबर...' अजित पवारांसाठी मनसे मैदानात उतरणार? राज ठाकरे आणि रोहित पवार यांच्या भेटीत काय घडलं?
Rohit Pawar Meets Raj Thackeray : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघात प्रकरणाचा मुद्दा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी चांगलाच लावून धरलेला आहे. याप्रकरणी एफआयआर का घेतला जात नाही असा सवाल ते उपस्थित करत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी आज (27 फेब्रुवारी) मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी अजित पवार यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन असं आश्वासन ठाकरेंनी दिल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं. या भेटीबद्दल रोहित पवार नेमकं काय म्हणाले जाणून घेऊया.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'मी नक्कीच दादांबरोबर...'
अजित पवारांसाठी मनसे मैदानात उतरणार?
राज ठाकरे आणि रोहित पवार यांच्या भेटीत काय घडलं?
Rohit Pawar Meets Raj Thackeray : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघात प्रकरणाचा मुद्दा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी चांगलाच लावून धरलेला आहे. याप्रकरणी एफआयआर का घेतला जात नाही असा सवाल ते उपस्थित करत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी आज (27 फेब्रुवारी) शिवतीर्थवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी अजित पवार यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन असं आश्वासन ठाकरेंनी दिल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं. या भेटीबद्दल रोहित पवार नेमकं काय म्हणाले जाणून घेऊया.
हे ही वाचा : मद्य घोटाळाप्रकरणी केजरीवालांची निर्दोष मुक्तता, निकालानंतर अश्रूंचा बांध फुटला; मोदी आणि शहांबद्दल काय म्हणाले?
राज ठाकरेंनी दिले दोन दाखले
राज ठाकरे यांच्या भेटीनंतर रोहित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या भेटीत एफआयार संदर्भात ठाकरेंनी त्यांना सुप्रीम कोर्टाचे दोन दाखले त्यांनी सांगितलं. रोहित पवार म्हणाले की, 'राज ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टाचे दोन दाखले दिले. जरी अपघाती मृत्यू झाला असला तरी एफआयआर घेता येतो. तो नागरिकांचा हक्क आहे. दुसरा दाखला असा दिला की, काहीही झालं तरी पोलिसांना एफआयआर घ्यावाच लागतो. यानंतर त्यांनी एकच प्रश्न केला की, या महाराष्ट्रातील एका व्यक्तीचा, मोठ्या नेत्याचा, देशाच्या नागरिकाचा एफआयआरच होत नसेल तर ती अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. याबाबतीत ते काय आणि कशी भूमिका घेतील ते येत्या काळात स्पष्ट होईलच. पण त्यांनी (राज ठाकरे) सांगितलं की, दादांसोबत मी जवळून काम केलं आहे. जेव्हा भेटायचो तेव्हा बोलायचो. जर मराठी माणसाला न्याय मिळत नसेल तर त्यासाठी जे काय करायचं ते आमच्या लेव्हलला करु.'
'मी नक्कीच दादांबरोबर'
यापुढं बोलताना रोहित पवार म्हणाले की, 'राज ठाकरे साहेबांना भेटत असताना आज योगायोगाने मराठी दिवस आहे. मराठी माणसासाठी राज ठाकरे साहेब आजपर्यंत लढत आले आहेत. त्यामुळे दादांचा मुद्दा घेऊन पक्षाच्या, कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तुम्हीसुद्धा पाठिंबा आणि ताकद द्यावी अशी विनंती मी त्यांना केली. यावर ते (राज ठाकरे) म्हणाले की, मी नक्कीच दादांबरोबर असणार आहे. न्याय कसा मिळेल यासाठी मी प्रयत्न करेन.'










