27 फेब्रुवारीलाच का साजरा केला जातो मराठी भाषा गौरव दिन? कधीपासून झाली सुरूवात? जाणूया इतिहास आणि महत्त्व

मुंबई तक

थोर मराठी साहित्यिक विष्णु वामन शिरवाडकर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी 'मराठी भाषा गौरव दिन' साजरा केला जातो. परंतु, अनेकदा सर्वसामान्य माणसाकडून 'मराठी भाषा गौरव दिन' आणि 'मराठी राजभाषा दिवस' यांच्यात गफलत केली जाते. यामागचा नेमका इतिहास काय? सविस्तर जाणून घ्या.

ADVERTISEMENT

27 फेब्रुवारीलाच का साजरा केला जातो मराठी भाषा गौरव दिन?
27 फेब्रुवारीलाच का साजरा केला जातो मराठी भाषा गौरव दिन?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

27 फेब्रुवारीलाच का साजरा केला जातो मराठी भाषा गौरव दिन?

point

कधीपासून झाली सुरूवात? जाणूया इतिहास आणि महत्त्व

मराठी भाषा गौरव दिन: थोर मराठी साहित्यिक विष्णु वामन शिरवाडकर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी 'मराठी भाषा गौरव दिन' साजरा केला जातो. 27 फेब्रुवारी 1912 रोजी विष्णु वामन शिरवाडकर यांचा जन्म झाला. ते मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार कथाकार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने कवितालेखन केले. वि.स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. कुसुमाग्रजांनी मराठी भाषेला 'ज्ञानभाषा म्हणून प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आयुष्यभर मोलाचे योगदान दिले. त्यांच्या या अतुलनीय कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 2013 पासून त्यांचा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून घोषित केला. 

'मराठी भाषा गौरव दिवस'

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण 2010 मध्ये नमूद असल्याप्रमाणे, मध्ये कवी कुसुमाग्रज यांनी साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात दिलेल्या मौल्यवान योगदानाच्या सन्मानार्थ 27 फेब्रुवारी हा दिवस 'मराठी भाषा गौरव दिवस' म्हणून साजरा केला जातो. परंतु, अनेकदा सर्वसामान्य माणसाकडून 'मराठी भाषा गौरव दिन' आणि 'मराठी राजभाषा दिवस' यांच्यात गफलत केली जाते. 

'मराठी राजभाषा दिन' कधी असतो? 

1960 साली महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि मराठी ही या राज्याची राजभाषा झाली. महाराष्ट्र सरकारने 5 जुलै रोजी भाषा संचालनालयाची स्थापना करणारी एक सूचना जारी केली ज्यामध्ये 'महाराष्ट्र राजभाषा कायदा 1964' नुसार मराठी भाषेला अधिकृतपणे राजभाषेचा दर्जा मिळाला. अशाप्रकारे, 1 मे 1966 पासून राज्यातील सर्व सरकारी कामकाजासाठी मराठी राजभाषा कायदा लागू करण्यात आला. 

हे ही वाचा: 'टिपू सुलतानने 75 हजार हिंदूंची कत्तल केली..' विधानसभेत फडणवीसांचं दीड तास भाषण; नेमकं काय म्हणाले?

मराठी कविता या साहित्यप्रकाराला वेगळ्या उंचीवर नेणारे कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या मायबोलीला म्हणजेच मराठीला साहित्यात विशेष स्थान मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. यावर्षी (2026) प्रसिद्ध कवी विष्णु वामन शिरवाडकर यांची 112 वी जयंती आहे. कुसुमाग्रज हे मराठी कवी, नाटककार, कादंबरीकार आणि लघुकथाकार होते. त्यांनी स्वातंत्र्य, न्याय आणि वंचितांच्या मुक्ततेबद्दल लिहिलं आणि मराठी साहित्यातील त्यांच्या योगदानामुळे त्यांना 1987 मध्ये ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर, मराठी भाषेला ज्ञानभाषेचा दर्जा मिळावा म्हणून अथक परिश्रम करणारे विष्णु वामन शिरवाडकर यांचा वाढदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा केला जातो. 

हे वाचलं का?

    follow whatsapp