विधान परिषद निवडणूक: तटकरेंचा मुलगा आमदार झाला, पण पडद्यामागे नेमकं कोणतं राजकारण?

मुंबई तक

Raigad MLC Election: रायगड विधानपरिषद निवडणुकीत राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला असून नितेश राणे यांनी शेवटच्या क्षणी केलेल्या एका मोठ्या राजकीय खेळीमुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला मोठा धक्का बसला.

ADVERTISEMENT

google news

रायगड: रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधानपरिषद निवडणूक ही केवळ महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत नव्हती, तर ती कोकणातील राजकीय वर्चस्वाची लढाई मानली जात होती. महायुतीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांच्या विजयामागे शेवटच्या टप्प्यातील राजकीय गणिते आणि मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांशी केलेले सूक्ष्म व्यवस्थापन महत्त्वाचे ठरल्याची चर्चा आहे.

तटकरे कुटुंबाचा प्रभाव

रायगड आणि कोकण पट्ट्यात सुनील तटकरे आणि तटकरे कुटुंबाचे मजबूत संघटनात्मक जाळे आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनेक वर्षे निर्माण झालेला संपर्क आणि प्रभाव हा अनिकेत तटकरे यांच्यासाठी मोठा प्लस पॉइंट ठरल्याचे मानले जाते. तटकरे यापूर्वीही याच मतदारसंघातून विधान परिषदेत निवडून गेले होते.

या विजयाचे राजकीय महत्त्व

अनिकेत तटकरे यांच्या विजयामुळे महायुतीने कोकणातील आपली पकड कायम असल्याचा संदेश दिला आहे. दुसरीकडे, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निकाल ठाकरे गटासाठी चिंतेचा विषय मानला जात आहे. कोकणात महायुतीचे संघटन आणि तटकरे-राणे यांचे स्थानिक नेटवर्क अजूनही प्रभावी असल्याचे या निकालातून दिसून येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

हे वाचलं का?