नवरा दारू पिऊन फुल्ल टाईट, गर्भवती बायकोची विळ्याने निर्घृण हत्या
Crime News : आठ महिन्याच्या गर्भवती महिलेवर तिच्याच पतीने विळ्याने सपासप वार करत संपवल्याचा आरोप करण्यात आला. संबंधित प्रकरणात पोलिसांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न देखील केल्याचे वृत्त समोर आले आहे. संबंधित प्रकरणात आईच्या हत्येचा पाच वर्षांचा मुलगा साक्षीदार आहे. मुलानेच आईच्या हत्येचं प्रकरण उघडकीस आणलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मद्यधुंद नवऱ्याचा बायकोसोबत वाद
मनिषावर कोयत्याने डोक्यावर आणि मानेवर सपासप वार करत संपवलं
Crime News : आठ महिन्याच्या गर्भवती महिलेवर तिच्याच पतीने विळ्याने सपासप वार करत संपवल्याचा आरोप करण्यात आला. संबंधित प्रकरणात पोलिसांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न देखील केल्याचे वृत्त समोर आले आहे. संबंधित प्रकरणात आईच्या हत्येचा पाच वर्षांचा मुलगा साक्षीदार आहे. मुलानेच आईच्या हत्येचं प्रकरण उघडकीस आणलं आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील कानपूर येथील महोबा जिल्ह्यात घडली असून घटनेनं परिसर हादरला.
हे ही वाचा : नर्सरीच्या विद्यार्थ्यानं पँटमध्ये केली लघवी, शिक्षिकेनं चाकू तापवला अन् दिले गुप्तांगाला भयंकर चटके
मद्यधुंद नवऱ्याचा बायकोसोबत वाद
पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना महोबा जिल्ह्यातील पानवाडी पोलीस ठाणे परिसरातील बिजरारी गावातील आहे. जोडप्याच्या मुलाने आरोपी हनीफ (वय 35) याचे म्हणणे खोडून काढले, नंतर पोलीस चौकशीदरम्यान आरोपीला ताब्यात घेतले. हनीफ हा बिजरारी गावात आपल्या पत्नीसोबत राहत होता. शनिवारी रात्री उशिराने तो कथितरित्या दारूच्या नशेत घरी परतला आणि त्याचा आपल्या पत्नीसोबत वाद झाला.
मनिषावर कोयत्याने डोक्यावर आणि मानेवर सपासप वार करत संपवलं
याच रागाच्याभरात हनीफने पत्नी मनिषावर कोयत्याने डोक्यावर आणि मानेवर सपासप वार केले. या हल्ल्यात पीडित महिला मनिषाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर हनीफने 112 वर फोन करून पत्नीची हत्या केल्याचा दावा केला. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी शोध सुरू केला असता, हे प्रकरण समोर आले.
दरम्यान, हनीफ हा पत्नी मनिषाला सातत्याने हुंड्यावरून डिवचत होता. तिला सातत्याने हुंड्याची मागणी करत होता. त्याने तिला अनेकदा दारू पिऊन त्रास दिल्याचा आरोप करण्यात आलाय. दारूसाठी त्याने काही जमीन देखील विकल्याची माहिती समोर आली. नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून ती आपल्या माहेरी राहिली होती. मात्र, तिच्या पतीचे हे हिंसक वर्तन तिच्याविरोधात सुरूच राहिले होते.
