Govt Jobs : इस्रोमध्ये विविध पदांसाठी भरती सुरु, 70 हजार रुपयांपर्यंत पगार
सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये विविध पदांसाठी भरती सुरु झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 9 नोव्हेंबर आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
इस्रोमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी
अर्ज कसा करावा?
ISRO Recruitment : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) श्रीहरीकोटा येथील 'सतीश धवन स्पेस सेंटर' (SDSC SHAR) द्वारे विविध पदांच्या 97 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेत टेक्निकल असिस्टंट (14), सायंटिफिक असिस्टंट (03), लायब्ररी असिस्टंट 'A' (03), नर्स 'B' (03), टेक्निशियन 'B' (43), ड्राफ्ट्समन 'B' (01), फायरमन 'A' (02), लाईट व्हेईकल ड्रायव्हर (05), हेवी व्हेईकल ड्रायव्हर (07) आणि मल्टी टास्किंग स्टाफ (16) अशा विविध पदांचा समावेश आहे.
शैक्षणिक पात्रता काय?
या भरतीसाठी पदानुसार शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. टेक्निकल असिस्टंट पदासाठी संबंधित शाखेतील प्रथम श्रेणी डिप्लोमा, तर सायंटिफिक असिस्टंटसाठी प्रथम श्रेणी B.Sc. किंवा BFA/व्हिज्युअल आर्ट्स पदवी आवश्यक आहे. लायब्ररी असिस्टंटसाठी प्रथम श्रेणी पदवी व पदव्युत्तर पदवी (M.Lib), तर नर्स 'B' साठी प्रथम श्रेणी नर्सिंग डिप्लोमा अनिवार्य आहे. टेक्निशियन, ड्राफ्ट्समन, ड्रायव्हर आणि इतर पदांसाठी दहावी उत्तीर्ण सोबत संबंधित ट्रेडमधील ITI, वैध वाहन चालक परवाना किंवा 3 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) आणि फायरमन पदासाठी दहावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात.
हे ही वाचा : राहुल गांधींच्या फोनमुळे भाजप प्रवेश थांबवला, पण आता थेट बोंद्रेंच्या संस्थांना नोटीस
'असा' करा अर्ज
या भरतीसाठी अर्ज शुल्काचा विचार केल्यास, काही पदांसाठी जनरल/OBC साठी 750 रुपये शुल्क असून लेखी परीक्षेनंतर 500 रुपये परत केले जातील. तर काही पदांसाठी 500 रुपये शुल्क असून यातील 400 रुपये परत मिळतील. SC/ST/ExSM/PWD आणि सर्व महिला उमेदवारांना पूर्ण परीक्षा शुल्क परतावा मिळणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 9 नोव्हेंबरपूर्वी अधिकृत वेबसाईटवर (www.shar.gov.in) ऑनलाईन अर्ज करावेत.
हे ही वाचा : नागपूर: विद्यार्थिनीला पाठवले अश्लील मेसेज, सिम्बायोसिस लॉ कॉलेजच्या प्रोफेसरचं लज्जास्पद कृत्य
पगार किती मिळणार?
निवड झालेल्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार आकर्षक वेतन व भत्ते मिळतील. टेक्निकल असिस्टंट, सायंटिफिक असिस्टंट, लायब्ररी असिस्टंट आणि नर्स 'B' या पदांसाठी अंदाजे मूळ वेतन व महागाई भत्त्यासह दरमहा 71,840 रुपये टेक्निशियन, ड्राफ्ट्समन व ड्रायव्हर पदांसाठी 34,720 रुपये, फायरमन पदासाठी 31,840 रुपये; तर मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) पदासाठी 28,800 रुपये प्रतिमहिना वेतन मिळेल. या व्यतिरिक्त HRA आणि परिवहन भत्ता लागू असेल.
