नागपूर: विद्यार्थिनीला पाठवले अश्लील मेसेज, सिम्बायोसिस लॉ कॉलेजच्या प्रोफेसरचं लज्जास्पद कृत्य

Nagpur cime news : नागपूरच्या वाठोडा येथे सिम्बाोसिस लॉ युनिवर्सिटीत एक गंभीर प्रकरण समोर आले. याच युनिवर्सिटीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीला कॉलेजच्या प्रोफेसरने कथितरित्या अश्लील मेसेज पाठवल्याचा आरोप आहे.

ADVERTISEMENT

Nagpur cime news
Nagpur cime news
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

पीडितेला प्रोफेसर पाठवत होता अश्लील मेसेज  

point

शिक्षकाला निलंबित न केल्याने आंदोलकांमध्ये नाराजीचा सूर 

Nagpur Cime News : नागपूरच्या वाठोडा येथे सिम्बाोसिस लॉ युनिवर्सिटीत एक गंभीर प्रकरण समोर आले. याच युनिवर्सिटीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीला कॉलेजच्या प्रोफेसरने कथितरित्या अश्लील मेसेज पाठवल्याचा आरोप आहे. विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी दावा केला की, या मेसेजेसमध्ये धार्मिक परंपरा आणि अपत्तीजनक स्थितीवर भाष्य करण्यात आले होते. या घटनेनंतर विद्यार्थीनीचे वडील हे कॉलेज परिसरात पोहोचले आणि प्रोफेसरकडे त्यांनी याबाबत जाब विचारला. यानंतर कथितरित्या त्यांनी प्रोफेसरच्या कानशीलात लगावली. 

हे ही वाचा : टायगर श्रॉफवर गोळीबार, 15 तासांत शुटर कोटा येथे कसे पोहोचले?

पीडितेला प्रोफेसर पाठवत होता अश्लील मेसेज  

घडलेल्या घटनेनुसार, ज्या शिक्षकावर अश्लील मेसेज पाठवल्याचा आरोप केला तोच शिक्षक अलीगढ मुस्लिम युनिवर्सिटीतील शिक्षक आहे. यापूर्वी हाच शिक्षक हैदराबाद येथे एका विद्यालयात नोकरी करत होता. सध्या ते नागपूरमधील वाठोडा येथील सिम्बायोसिस लॉ युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत असल्याचे सांगितले जाते. या प्रकरणात सांगितले गेले की, विद्यार्थ्यांना अश्लील आणि धर्माबाबत कथितरित्या अपत्तीजनक संदेश पाठवत होता. परिस्थिती पाहता संबंधित शिक्षकाला तात्काळपणे निलंबित केले जावे अशी मागणी जोर धरू लागली. 

शिक्षकाला निलंबित न केल्याने आंदोलकांमध्ये नाराजीचा सूर 

यादरम्यान आंदोलन सुरु असताना पोलीस प्रशासनाने कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे. विद्यालयाच्या प्रशासनाने संबंधित शिक्षकाविरुद्ध 15 दिवसांदरम्यान कठोर कारवाईचे करण्याचे आश्वासन दिले होते. अजूनपर्यंत शिक्षकाला निलंबित न केल्याने आंदोलकांमध्ये नाराजीचा सूर आहे. कॉलेजच्या विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला. 

हे ही वाचा : अंबाजोगाईत दारुड्या पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेनं स्वत:ला संपवलं; नवऱ्यावर गुन्हा दाखल

या घटनेनंतर सोशल मीडियावरही हे प्रकरण चर्चेचा विषय बनले आहे. कॉलेजचे विद्यार्थी प्रोफेसरशी संबंधित विविध पोस्ट आणि किस्से शेअर करत आहेत. दरम्यान, शनिवारी विविध विद्यार्थी संघटना आणि विश्व हिंदू परिषदेच्या सदस्यांनी महाविद्यालय परिसराबाहेर आंदोलन केल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.