आत्याचा मुलगा छेड काढतो म्हणून घर सोडले, आता अडकली जाळ्यात
Beed crime : पोलिसांनी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने धाडसी कामगिरी करत अल्पवयीन मुलीची विक्री करणाऱ्या कुख्यात टोळीला जेरबंद केले. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 2021 मध्ये अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बालविवाह लावून दिल्याचा संतापजनक प्रकार
मुंबईत विक्रीसाठी पाच लाखांचा सौदा
Beed Crime : रोहिदास हातागळे - पोलिसांनी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने धाडसी कामगिरी करत अल्पवयीन मुलीची विक्री करणाऱ्या कुख्यात टोळीला जेरबंद करण्यात आले. 2021 पासून दाखल केलेल्या एका गुन्ह्याचा पोलीस कसून शोध घेत आहेत. या प्रकरणात पोलिसांनी पीडित मुलीची सुटका केली आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 2021 मध्ये अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हे ही वाचा : टायगर श्रॉफवर गोळीबार, 15 तासांत शुटर कोटा येथे कसे पोहोचले?
ठोस पुरावा न मिळाल्याने फाईल बंद होण्याच्या मार्गावर
या प्रकरणाच्या तपासासाठी एएचटीयू कक्षाकडे वर्ग करण्यात आलाय, मात्र, या प्रकरणी कोणताही ठोस पुरावा न मिळाल्याने ही फाईल बंद होण्याच्या मार्गावर होती. पोलिसांनी या घटनेचा फेरतपास सुरू केला आणि खबऱ्यांचे जाळे सक्रिय करून 17 ऑक्टोबर रोजी गेवराई तालुक्यात पोलिसांनी सापळा रचत कारवाई केली होती.
मुंबईत विक्रीसाठी पाच लाखांचा सौदा
पीडित मुलीचा सविस्तर जबाब नोंदवण्यात आला असता, त्यातून एक धक्कादायक करून टाकणारी माहिती उघडकीस आली. आत्याचा मुलगा हा छेड काढत असल्याने आणि कुटुंबीयांनी न ऐकल्याने तिने घर सोडले. यादरम्यान बसने प्रवास करताना छत्रपती संभाजीनगर येथील महिलेशी ओळख झाली होती. त्यानंतर बीड आणि पुण्यात नेऊन तिला हुक्का बपमध्ये नेण्यात आले होते. अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिची मुंबईत विक्रीसाठी पाच लाखांचा सौदा करण्याचे ठरवले. हा सौदा छत्रपती संभाजीनगर येथील महिलेनं ठरवला होता, नंतर हा व्यवहार रद्द झाल्याची माहिती आहे.
बालविवाह लावून दिल्याचा संतापजनक प्रकार
दरम्यान, बीडनंतर पुन्हा तिला संभाजीनगर येथे नेले आणि तिथून एक लाख रुपये घेऊन पैठण येथील मठात 2023 मध्ये तिचा बालविवाह लावून दिल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला होता. 2021 मध्ये अपहरणाचा गुन्हा तपास न करताच प्रलंबित राहिल्याने फाईल बंद होण्याच्या स्थितीत होती. मात्र, एएचटीयू पथकाने बातमीदारांचे जाळे सक्रिय करून या मानवी तस्करीचा उलगडा केला.
हे ही वाचा : नागपूर: विद्यार्थिनीला पाठवले अश्लील मेसेज, सिम्बायोसिस लॉ कॉलेजच्या प्रोफेसरचं लज्जास्पद कृत्य
संबंधित प्रकरणात 2 महिला आणि 2 पुरूष आरोपी निष्पन्न झाले. याच पीडितेचा पती आणि आत्याच्या मुलासह दोन महिला आरोपी आहेत. महिलांमध्ये एक बीड आणि दुसरी छत्रपती संभाजीनगर येथील महिला आहे.
