पतीच्या अनैतिक संबंधांची माहिती मिळाली, महिलेने मध्यरात्री बेडरुममध्ये केली आत्महत्या

मुंबई तक

Bengaluru Crime News : पतीच्या कथित विवाहबाह्य संबंधांची माहिती ऑडिओ क्लिपमधून समजल्यानंतर 20 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बंगळुरूमध्ये घडला. मृत्यूआधी तिने पतीला व्हिडिओ कॉल करून आपण आयुष्य संपवत असल्याचे सांगितल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

ADVERTISEMENT

Bengaluru Crime News
Bengaluru Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

पतीच्या अनैतिक संबंधांची माहिती मिळाली

point

महिलेने मध्यरात्री बेडरुममध्ये केली आत्महत्या

Bengaluru Crime News : बंगळुरुमधील रायसंद्रा परिसरात 20 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत महिलेची ओळख सानिका गौडा अशी असून ती बाळंतपणानंतर आपल्या आई-वडिलांच्या घरी राहत होती. कुटुंबीयांच्या आरोपानुसार, पतीच्या कथित विवाहबाह्य संबंधांची माहिती तिला एका ऑडिओ क्लिपमधून मिळाली होती. त्यानंतर ती मानसिक तणावात गेली होती. प्राथमिक तपासानुसार रविवारी पहाटे 1.30 ते 2 वाजण्याच्या दरम्यान तिने बेडरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. पहाटे सुमारे 3 वाजता मडीवाळा मार्केटमध्ये दुकान चालवणारे तिचे वडील जागे झाले असता त्यांनी सानिकाला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिले. त्यावेळी तिचा सात महिन्यांचा मुलगा बेडवर झोपलेला होता.

हेही वाचा : पेपर फोडणाऱ्यांना चाप लावण्यासाठी मोदी सरकारचं मोठं पाऊल, परीक्षा सुधारणा विधेयक संसदेत सादर

पतीच्या कथित विवाहबाह्य संबंधांची माहिती मिळाली अन्

सानिकाचे लग्न चिक्कमंगळुरू येथील नागराज उर्फ शरण गौडा याच्यासोबत सुमारे दीड वर्षांपूर्वी झाले होते. नागराज हा कॅब चालक असून सानिका गृहिणी होती. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी सानिकाला पतीच्या कथित विवाहबाह्य संबंधांची माहिती मिळाली होती. यानंतर तिने पतीला याबाबत जाब विचारला होता आणि संबंधित महिलेला पुन्हा भेटू नये, अशी ताकीदही दिली होती. मात्र, त्यानंतर नागराजने दुसऱ्या महिलेसोबतचे संभाषण असलेली एक ऑडिओ क्लिप सानिकाला पाठवली होती. या ऑडिओ क्लिपमधून त्याच्या कथित विवाहबाह्य संबंधांचा उल्लेख असल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा : कॉकरोच जनता पार्टी आता पंजाबमधील 'त्या' मुद्द्यावरही बोलणार, अभिजीत दिपकेंनी सगळं सांगितलं