कल्याण : नागरिकांच्या मदतीसाठी गेलेल्या पोलिसावर काठीने हल्ला, काय घडलं? VIDEO
kalyan crime : कल्याणमध्ये नागरिकांच्या तक्रारीनंतर मदतीसाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर मद्यधुंद तरुणाने काठीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
कल्याण : नागरिकांच्या मदतीसाठी गेलेल्या पोलिसावर काठीने हल्ला
काय घडलं? घटनेचा VIDEO व्हायरल
kalyan crime : कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा परिसरात पोलीस कर्मचाऱ्यावर मद्यधुंद तरुणाने काठीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागरिकांच्या तक्रारीवर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावरच हा जीवघेणा हल्ला करण्यात आला. या संपूर्ण घटनेचा परिसरातील सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा : कॉकरोच जनता पार्टी आता पंजाबमधील 'त्या' मुद्द्यावरही बोलणार, अभिजीत दिपकेंनी सगळं सांगितलं
तरुणाचा मद्यधुंद अवस्थेत आरडाओरडा
मिळालेल्या माहितीनुसार, गौरीपाडा परिसरात राहुल तायडे हा तरुण मद्यधुंद अवस्थेत नागरिकांच्या घराबाहेर उभा राहून आरडाओरडा करत होता. त्याच्या या वर्तनामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते. अखेर नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून याबाबत तक्रार नोंदवली. तक्रार मिळाल्यानंतर खडकपाडा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी गणेश चव्हाण घटनास्थळी दाखल झाले.
हेही वाचा : 'उत्तर प्रदेशची निवडणूक महत्त्वाची, योगींसाठी कठीण काळ', नवनीत मनधानी काय म्हणाले?
