नर्सरीच्या विद्यार्थ्यानं पँटमध्ये केली लघवी, शिक्षिकेनं चाकू तापवला अन् दिले गुप्तांगाला भयंकर चटके

मुंबई तक

Crime News : लहान विद्यार्थ्याने पँटमध्ये लघवी केल्याने त्याच्या वर्ग शिक्षिकेनं पीडित विद्यार्थ्याचे प्रायव्हेट पार्टला चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. संबंधित विद्यार्थी हा नर्सरीत शिकत होता, त्याने आपल्या शिक्षिकेला लघवीला जाण्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र, शिक्षिकेनं पीडित विद्यार्थ्याला नकार दिला असता, चिमुकल्या विद्यार्थ्याचा संयम तुटल्याने त्याने आपल्या पँटमध्येच लघवी केली.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

गॅसवर चाकू गरम करत चिमुकल्याचं गुप्तांगाला दिले चटके

point

शिक्षक-विद्यार्थ्याच्या नात्याला काळिमा

Crime News : लहान विद्यार्थ्याने पँटमध्ये लघवी केल्याने त्याच्या वर्ग शिक्षिकेनं पीडित विद्यार्थ्याचे प्रायव्हेट पार्टला चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. संबंधित विद्यार्थी हा नर्सरीत शिकत होता, त्याने आपल्या शिक्षिकेला लघवीला जाण्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र, शिक्षिकेनं पीडित विद्यार्थ्याला नकार दिला असता, चिमुकल्या विद्यार्थ्याचा संयम तुटल्याने त्याने आपल्या पँटमध्येच लघवी केली. शिक्षक-विद्यार्थ्याच्या नात्याला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील वाराणसीतील आहे. या घटनेनं परिसर हादरून गेल्याचे वृत्त आहे. 

हे ही वाचा : आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर AK 47 ने गोळीबार, राहुल गांधींकडून व्हिडिओ शेअर

गॅसवर चाकू गरम करत चिमुकल्याच्या गुप्तांगाला चटके

क्रूर शिक्षिका या क्षुल्लक कारणावरून संतापली. तिने एका गॅसवर चाकू गरम केला आणि चिमुरड्यावर अत्याचार करत त्याच्या गुप्तांगाला चटके दिले. या घटनेनंतर पीडित मुलाच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि आरोपी महिला शिक्षिकेवर गुन्हा दाखल केला आहे. 

मुख्यध्यापिकेकडून धमकी 

चिमुकल्याने घरी गेल्यानंतर घडलेला सर्व प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला. कुटुंबीयांनी महिला शिक्षिकेशी संपर्क करण्याचा प्रयत्न देखील केला होता. मात्र, महिला शिक्षिकेनं फोनद्वारे कोणताही प्रतिसाद दिला नाही. यानंतर पीडित वडिलांनी शाळेच्या मुख्याध्यापिका हेमलता सिंह यांच्यासोबत चर्चा केली. याउलट हेमलाता यांनी सहकार्य करण्याचे सोडून धमकी दिली. 

हे ही वाचा : पेपर फोडणाऱ्यांना चाप लावण्यासाठी मोदी सरकारचं मोठं पाऊल, परीक्षा सुधारणा विधेयक संसदेत सादर