Monsoon Update: 11 जिल्ह्यांमध्ये वेगाने वाहणार वारे.. मुसळधार पाऊस, थोड्याच वेळात बदलणार हवामान
Maharashtra Weather: कोकण, मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जाणून घ्या महाराष्ट्रात आज (6 जून) नेमकं कसं असेल हवामान.
ADVERTISEMENT

Maharashtra Monsoon Update: मुंबई: महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाने जोर धरला असून 6 जून रोजी राज्यातील अनेक भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. विशेषतः दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यासोबतच ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता
हवामान विभागाच्या अंदाजानुसार दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होण्याची शक्यता आहे. या भागांमध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस पडू शकतो. तसेच ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हे ही वाचा>> केरळमध्ये मान्सूनचे आगमन; महाराष्ट्रात कधी दाखल होणार?
सिंधुदुर्ग, रत्नागिरी तसेच सातारा, सांगली, कोल्हापूर आणि आसपासच्या भागांमध्ये हवामान अचानक बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी, मच्छीमार आणि प्रवाशांनी विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पावसाचा अंदाज
उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्येही मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. या भागांमध्येही विजांचा कडकडाट आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.









