'टिपू सुलतानने 75 हजार हिंदूंची कत्तल केली..' विधानसभेत फडणवीसांचं दीड तास भाषण; नेमकं काय म्हणाले?

मुंबई तक

Devendra Fadnavis Vidhansabha Speech : महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन विविध कारणांनी गाजत आहे. आज (26 फेब्रुवारी) या अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावर अनेकांची भाषणं झाली. राज्यपालांच्या अभिभाषणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल दीड तास भाषण केले. यावेळी बोलताना त्यांनी टिपू सुलतान ते राज्याची अर्थव्यवस्था अशा विविध विषयांवर भाष्य केले. ते म्हणाले की, 'देशाच्या इतिहासाशी छेडछाड करण्यात आली. टिपू सुलतानने 75 हजार हिंदूंची हत्या केल्याचं गेल्या 70 वर्षात कधी शिकवण्यात आलंच नाही.'

ADVERTISEMENT

Devendra Fadnavis Vidhansabha Speech
Devendra Fadnavis Vidhansabha Speech
social share
google news

बातम्या हायलाइट

point

'टिपू सुलतानने 75 हजार हिंदूंची कत्तल केली...

point

विधानसभेत फडणवीसांचं दीड तास भाषण

point

नेमकं काय म्हणाले?

Devendra Fadnavis Vidhansabha Speech : महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन विविध कारणांनी गाजत आहे. आज (26 फेब्रुवारी) या अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावर अनेकांची भाषणं झाली. राज्यपालांच्या अभिभाषणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल दीड तास भाषण केले. यावेळी बोलताना त्यांनी टिपू सुलतान ते राज्याची अर्थव्यवस्था अशा विविध विषयांवर भाष्य केले. ते म्हणाले की, 'देशाच्या इतिहासाशी छेडछाड करण्यात आली. टिपू सुलतानने 75 हजार हिंदूंची हत्या केल्याचं गेल्या 70 वर्षात कधी शिकवण्यात आलंच नाही.' यासोबतच एनसीईआरटीच्या पुस्तकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला मोदी सरकारने वीस पानं दिल्याचंही त्यांनी सांगितलं. इतिहास आणि राज्याची अर्थव्यवस्था याबद्दल फडणवीस नेमकं काय म्हणाले, जाणून घेऊया.

हे ही वाचा : पुण्यात क्रेनचा पट्टा तुटल्याने अपघात, सळई पडून महिला कामगाराचा दुर्दैवी मृत्यू

टिपू सुलतानने 75 हजार हिंदूंची कत्तल केली

राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना फडणवीसांनी टिपू सुलतान आणि इतिहासाविषयी भाष्य केले. ते म्हणाले की, 'टिपू सुलतान चांगले होते की वाईट होते यावर आमचा आक्षेप नाही. टिपू सुलतान छत्रपती शिवरायांएवढे मोठे राजे होते यावर आमचा आक्षेप आहे. ज्यावेळी असं म्हटलं जातं की छत्रपती शिवरायांएवढंच गुणगान टिपू सुलतीनचं केलं पाहिजे, त्याला आमचा आक्षेप आहे. दुर्दैवाने देशाच्या इतिहासाशी छेडछाड करण्यात आली. आम्हाला वर्षानुवर्ष हे शिकवण्यात आलं की, टिपू सुलतान महान राजे होते. पण हे कधी शिकवलं नाही की 75 हजार हिंदूंची आणि 33 हजार नायरांची कत्तल करणारेही टिपू सुलतान होते. ते इंग्रजांशी स्वत:च राज्य वाचवायला लढले'

इतिहासाच्या पुस्तकाबद्दल काय म्हणाले फडणवीस?

एनसीईआरटीच्या पुस्तकातील इतिहासाबद्दल फडणवीसांनी गेल्या 70 वर्षात शिकवण्यात आलेल्या इतिहासाबद्दल भाष्य केले. ते म्हणाले की, वर्षानुवर्ष या देशात 70 वर्षे एनसीईआरटीच्या पुस्तकांमध्ये मुघल साम्राज्याला 17 पानं दिली आणि शिवाजी महाराजांना एक परिच्छेद दिला. मात्र आता मोदी सरकारने एनसीईआरटीच्या पुस्तकात 20 पानं दिली. योग्य वेळी नीट इतिहास शिकवला असता तर देशातील एकाही मुसलमानाने औरंगजेबाला आपला हिरो म्हटलं नसतं.' तसेच आपण खरा इतिहास कधी शिकवलाच नसल्याचंही फडणवीस म्हणाले. दरम्यान, मोदी सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला एनसीईआरटीच्या पुस्तकात वीस पानं दिल्याचा उल्लेख करताच सभागृह 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' या घोषणांनी निनादून गेले.

हे वाचलं का?

    follow whatsapp