पुण्यात क्रेनचा पट्टा तुटल्याने अपघात, सळई पडून महिला कामगाराचा दुर्दैवी मृत्यू
Pune News : पुण्यातील हडपसर येथील रामटेकडी औद्योकीक वसाहतीत लोखंडी जिन्याचे काम सुरु असताना क्रेनचा पट्टा अचानकपणे तुटल्याने लोखंडी सळई महिला कामगाराच्या डोक्यात आदळली. या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघाताप्रकरणी वानवडी पोलिसांनी क्रेनचालक आणि ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.या घटनेनं परिसर हादरून गेल्याचं वृत्त आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
लोखंडी सळई महिला कामगाराच्या डोक्यात पडली
महिलेचा दुर्दैवी मृत्यू
Pune News : आदित्य भावार - पुण्यातील हडपसर येथील रामटेकडी औद्योकीक वसाहतीत मन हेलावून टाकमारी घटना घडली. लोखंडी जिन्याचे काम सुरु असताना, क्रेनचा पट्टा अचानकपणे तुटल्याने लोखंडी सळई महिला कामगाराच्या डोक्यात आदळली. या अपघातात महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघाताप्रकरणी वानवडी पोलिसांनी क्रेनचालक आणि ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनं परिसर हादरून गेल्याचं वृत्त आहे.
हे ही वाचा : नागपूर : 64 वर्षीय महिलेवर बैलाने हल्ला केला, पीडितेच्या मेंदूला जबर मार, मृत्यूशी देते झुंज.. Video व्हायरल
या अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव वैशाली मारूती भोसले (वय 47) असे आहे. हडपसर येथील रामटेकडी परिसरातील औद्योगिक वसाहतीतील एका खासगी कंपनीच्या आवारात लोखंडी जिना तयार करायचे काम सुरु होते. 18 फेब्रुवारी रोजी वैशाली आणि सहकारी पिण्याचे पाणी आणण्यासाठी कंपनीच्या आवारातून निघाल्या असताना क्रेनद्वारे लोखंडी सळई उचलण्याचे काम सुरु होते.
लोखंडी सळई वैशालीच्या डोक्यात पडून दुर्दैवी मृत्यू
याचदरम्यान, क्रेनचा पट्टा अचानकपणे तुटला आणि लोखंडी सळई थेट वैशालीच्या डोक्यात पडली. या दुर्घटनेत तिच्या डोक्याला जबर मार लागून ती जखमी झाली, त्यानंतर तिला खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
हे ही वाचा : कल्याण रेल्वे स्थानकावर लोकलमध्ये महिलांनी एकमेकींच्या उपटल्या झिंझ्या, व्हिडिओ होतोय व्हायरल










