नागपूर : 64 वर्षीय महिलेवर बैलाने हल्ला केला, पीडितेच्या मेंदूला जबर मार, मृत्यूशी देते झुंज.. Video व्हायरल
Nagpur News : नागपूरमधील हुडकेश्वरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील मानवी वस्तीत एका बैलाने वृद्ध महिलेवर हल्ला केला होता. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली आहे. वृद्ध महिलेचं नाव वंदना देवीकर (वय 64) असे आहे. ही घटना 27 जानेवारी रोजी घडल्याचे वृत्त आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बैलाच्या हल्ल्यात पीडित वृद्ध महिला मृत्यूशी देते झुंज
महिना उलटून गेला तरी प्रकृती चिंताजनक

हे ही वाचा : कल्याण रेल्वे स्थानकावर लोकलमध्ये महिलांनी एकमेकींच्या उपटल्या झिंझ्या, व्हिडिओ होतोय व्हायरल
बैलाच्या हल्ल्यात पीडित वृद्ध महिला मृत्यूशी देते झुंज
या हल्ल्यात वंदना देवीकर यांच्या मांडीला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली. तसेच मेंदूलाही जबर मार लागला आहे. त्यांना रुग्णालयातील आयसीयूत दाखल करण्यात आले. तसेच त्यांच्या मेंदूची शस्त्रक्रिया केली. त्यांनी अद्यापही डोळे उघडलेले नाहीत आणि प्रतिसाद दिलेला नाही. या गंभीर घटनेनं रहिवाशांच्या संरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
महिना उलटून गेला तरी प्रकृती चिंताजनक
या संबंधित घटनेचा व्हिडिओ समोर आलेला आहे. वंदना या घरात झाडू मारत होत्या, तेव्हा एका बैलाने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. एक महिना उलटून गेला तरी, वंदना यांची प्रकृती चिंताजनकच आहे. त्या मृत्यूशी झुंझ देत आहेत. या घटनेनं महापालिकेचे कामकाज आणि नागरिकांच्या संरक्षणाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. हल्ला करणारा बैल देखील त्याच परिसरात फिरत राहिल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त केला.
हे ही वाचा : नागपूर : भाचा बेडरुममध्ये शिरला अन् मामीसोबत केले नको तेच, पोलिसांनी आवळल्या मुसक्या