निवृत्त जवानाला चाकूने वार करुन संपवलं, पत्नी एवढी क्रूर का झाली? नेमकं काय घडलं?
Crime News : जेवण आणि घरातील जबाबदाऱ्यांवरून झालेल्या वादातून पत्नीने निवृत्त सैनिक पतीची चाकूने वार करून हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी पत्नीला ताब्यात घेतले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
निवृत्त जवानाला चाकूने वार करुन संपवलं,
पत्नी एवढी क्रूर का झाली? नेमकं काय घडलं?
Crime News : गुजरातमधील अहमदाबाद येथे कौटुंबिक वादातून पत्नीने आपल्या पतीची चाकूने वार करून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. जेवण आणि घरातील जबाबदाऱ्यांवरून झालेल्या वादानंतर पत्नीने स्वयंपाकघरातील चाकूने पतीवर हल्ला केला. या हल्ल्यात पतीचा मृत्यू झाला. दिलीप खराडी असे मृत पतीचे नाव असून ते भारतीय लष्करातून निवृत्त झाले होते. लष्करी सेवेतून बाहेर पडल्यानंतर ते चालक म्हणून काम करत होते. अहमदाबादमधील नरोडा स्मार्ट सिटी परिसरात 6 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली. दिलीप हे पत्नी निर्मला आणि त्यांच्या दोन मुलांसोबत राहत होते. घरातील किरकोळ कारणांवरून पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
हल्ल्यानंतर पत्नीने स्वत:च रुग्णालयात नेलं, पण तोवर पतीचा मृत्यू
अधिकची माहिती अशी की, 6 नोव्हेंबरच्या रात्री दिलीप आणि त्यांची पत्नी निर्मला यांच्यात पुन्हा एकदा वाद झाला. जेवण आणि घरातील जबाबदाऱ्यांवरून हा वाद सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे. सुरुवातीला दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. मात्र, त्यानंतर या वादाचे रूपांतर हिंसक घटनेत झाले. यावेळी निर्मला यांनी स्वयंपाकघरातील चाकू उचलून पती दिलीप यांच्या छातीच्या डाव्या बाजूला वार केला. हा वार हृदयाच्या वरच्या भागात लागल्याने दिलीप यांना गंभीर दुखापत झाली. पतीवर हल्ला केल्यानंतर निर्मला यांनी स्वतःच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेले. मात्र, रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी तपासणी करून दिलीप यांना मृत घोषित केले.
हेही वाचा : सोलापुरात भाजप-काँग्रेस नेत्यांमध्ये मध्यरात्री राडा; आमदार देवेंद्र कोठे आणि चेतन नरोटे आमनेसामने VIDEO
या घटनेबाबत वरिष्ठ पोलीस अधिकारी व्ही. एन. यादव यांनी माहिती दिली. 6 नोव्हेंबर रोजी रात्री 10 ते मध्यरात्रीच्या दरम्यान ही घटना घडल्याचे त्यांनी सांगितले. दिलीप आणि त्यांच्या पत्नीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून कौटुंबिक कारणांवरून वाद सुरू होते. गुरुवारी रात्रीही त्यांच्यात वाद झाला. यावेळी निर्मला यांनी चाकूने पतीच्या छातीवर वार केला. हा वार हृदयाच्या वरच्या भागात लागल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. या घटनेनंतर दिलीप यांच्या वडिलांनी नरोडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया केली.
दरम्यान, पतीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी निर्मला यांना ताब्यात घेतले आहे. त्यांची या प्रकरणात चौकशी सुरू असून, घटनेमागील नेमकी परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. दिलीप आणि निर्मला यांच्यात यापूर्वीही कौटुंबिक कारणांवरून वारंवार वाद होत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. जेवण आणि घरातील कामांच्या जबाबदाऱ्यांवरून सुरू झालेल्या वादाचा शेवट पतीच्या मृत्यूमध्ये झाला. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.
ो
