जिममधून बाहेर पडली अन् घडलं भयंकर, महामार्गावर सापडला तरुणीचा मृतदेह

एका जिम ट्रेनर तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. कानपूरमधील या घटनेमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

जिम ट्रेनर तरुणीचा संशयास्पद मृत्यू

point

नेमकं काय घडलं?

Crime News : एका महिला जीम ट्रेनर तरुणीचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशातील कानपूर-हावडा महामार्गावर हा मृतदेह सापडला. मृताची ओळख मंतशा (वय वर्ष 25) अशी पटली असून, ती कानपूरच्या जाजमऊ भागात जिम ट्रेनर म्हणून काम करत होती. तिचे कुटुंब मूळचे केरळमचे असून, ती तिचे वडील विजय कुमार यांच्यासोबत उन्नाव जिल्ह्यातील गंगाघाट भागात राहत होती.

जिममध्ये गेली, पण...

मंतशा गुरुवारी (5 नोव्हेंबर) सकाळी नेहमीप्रमाणे जिममध्ये जाण्यासाठी घरातून बाहेर पडली होती; परंतु ती संध्याकाळी परतली नाही. तिचा फोनही बंद येत असल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. ती कुठेही न सापडल्याने अखेर कुटुंबीयांनी गुरुवारीच गंगाघाट पोलीस ठाण्यात ती हरवल्याची तक्रार दाखल केली होती.

हे ही वाचा : 'माझ्या मृत्यूला व्यवस्था आणि भूमाफिया जबाबदार...' महिला आदिवासी नेत्याच्या मृत्यूने खळबळ

महामार्गाजवळ सापडला मृतदेह

शुक्रवारी सकाळी कानपूरच्या महाराजपूर परिसरात महामार्गाजवळ एका तरुणीचा मृतदेह पोलिसांना मिळाला. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी सोशल मीडियावर आणि परिसरात पोस्टर्स प्रसिद्ध केली होती. शुक्रवारी संध्याकाळी मृतदेहाचे कपडे आणि फोटोंवरून मंतशाच्या वडिलांनी महाराजपूर पोलीस ठाण्यात येऊन तिच्या मृतदेहाची ओळख पटवली.

हे ही वाचा : मुंबई : मोबाईलमध्ये अल्पवयीन मुलांचे 20 हजारांहून अधिक आक्षेपार्ह फोटो अन् व्हिडीओ, 49 वर्षीय व्यक्तीला अटक

तरुणावर संशय

मंतशाची हत्या करून तिचा मृतदेह महामार्गावर फेकून देण्यात आल्याचा संशय तिच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. तसेच तिच्या ओळखीतील एका तरुणावर कुटुंबीयांना संशय आहे. पोलिसांनी मृतदेह विच्छेदनासाठी (post-mortem) पाठवला असून, या अहवालानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येईल. सध्या पोलीस सर्व बाजूने या प्रकरणाचा तपास करत आहेत.