कल्याण रेल्वे स्थानकावर लोकलमध्ये महिलांनी एकमेकींच्या उपटल्या झिंझ्या, व्हिडिओ होतोय व्हायरल
Mumbai Local : मुंबई आणि मुंबई उपनगरांतील राहणाऱ्यांसाठी लोकल म्हणजे रोजच्या जीवनातील एक अविभाज्य घटक आहे. याच लोकलने प्रवास करताना मारहाणीच्या अनेक घटना सातत्याने घडू लागल्या आहेत. अशातच कल्याण स्थानकावर काही महिला एकमेकींच्या झिंझ्या ओढताना दिसत आहेत, त्यांचा व्हिडिओ जोरात व्हायरल होत आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
कल्याण रेल्वे स्थानकावर महिलांची तुफान हाणामारी
व्हिडिओ व्हायरल
Mumbai Local : मुंबई आणि मुंबई उपनगरांतील राहणाऱ्यांसाठी लोकल म्हणजे रोजच्या जीवनातील एक अविभाज्य घटक आहे. याच लोकलने प्रवास करताना मारहाणीच्या अनेक घटना सातत्याने घडू लागल्या आहेत. अशातच कल्याण स्थानकावर काही महिला एकमेकींच्या झिंझ्या ओढताना दिसत आहेत, त्यांचा व्हिडिओ जोरात व्हायरल होत आहे.
हे ही वाचा : नागपूर : भाचा बेडरुममध्ये शिरला अन् मामीसोबत केले नको तेच, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
कल्याण रेल्वे स्थानकावर महिलांची तुफान हाणामारी
मिळालेल्या माहितीनुसार, लोकल स्थानकावरून सुटताना संबंधित एक महिला रेल्वेत चढताना तिच्यावर काही लोकांनी हल्ला केल्याचा आरोप आहे. महिलांनी पीडितेचे केस ओढत मारहाण केली, तसेच जबरदस्ती डब्यातून खाली उतरवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
व्हिडिओत नेमकं काय?
संबंधित सर्व प्रकरण एका व्हिडिओत कैद करण्यात आल्याचे वृत्त आहे. काही प्रवाशांनी घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद केला आहे. व्हिडिओत काही महिला या दादागिरी करताना दिसत आहेत. घटनेनंतर रेल्वे प्रशासन आणि पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
हे ही वाचा : अजित पवारांच्या अपघाताची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी, मुंबई हायकोर्टात जनहित याचिका; 'या' आहेत प्रमुख मागण्या
या घटनेनं महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. रोजच्या वाढत्या लोकसंख्येमुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये देखील वाढ होऊ लागली आहे. यामुळे अशा घटना घडू लागली आहे. या प्रकरणी संबंधित महिलांविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.