काय आहेत शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अटी? जाणून घ्या सविस्तर

मुंबई तक

महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत, जाणून घ्या.

ADVERTISEMENT

Google CTA

Farmer Loan Waiver Scheme : महाराष्ट्र सरकाराने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. यानुसार 2 लाख रुपयांपर्यंतचे कृषी कर्ज माफ करण्याची योजना मंजूर करण्यात आली आहे. पावसाळ्याच्या तोंडावर घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे राज्यातील तब्बल 56 लाख शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. केवळ कर्जमाफीच नव्हे, तर ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड केली आहे, अशा शेतकऱ्यांचाही सरकारने विचार केला आहे.

नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतला आहे. या कर्जमाफी योजनेचं नाव 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना' असं आहे. या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र आहेत, त्याविषयी माहिती देणारा व्हिडिओ.