पुणे : एका महिन्यात 50 हून अधिक गर्भलिंग निदान चाचण्या, कसा झाला रॅकेटचा पर्दाफाश?
पुण्यात गर्भलिंग निदान चाचणीच्या एका रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. यामधून काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका महिन्यात 50 हून अधिक गर्भलिंग निदाण चाचण्या होत असल्याची माहिती पोलीस तपासात निष्पन्न झाली आहे.
ADVERTISEMENT
Pune Crime : पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि अत्यंत गंभीर बातमी समोर आली आहे. जिल्ह्यात बेकायदेशीरपणे गर्भलिंग चाचणी करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या रॅकेटचा मुख्य सूत्रधार केवळ 12 वी पास असून, कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना तो सर्रासपणे या चाचण्या करत होता. या काळ्या व्यवसायातून महिन्याला लाखो रुपयांची उलाढाल केली जात होती. धक्कादायक माहितीनुसार, एका महिन्यात तब्बल 50 हून अधिक गर्भलिंग चाचण्या येथे केल्या जात होत्या. या प्रकरणाच्या सखोल तपासामध्ये वैद्यकीय क्षेत्रातील तब्बल 15 नामांकित डॉक्टर्स सध्या पोलिसांच्या आणि प्रशासनाच्या तपासाच्या फेऱ्यात आले आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट पहा या व्हिडिओमध्ये.









