धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता ठाकरे बंधूंचा मोर्चा निघणार की नाही? ठाकरेंकडून मोठी घोषणा!

मुंबई तक

Raj Thackeray On Dharmendra Pradhan Resign : उद्या शिवाजीपार्क मैदानावरील वीर सावरकर मार्गावर कार्यक्रम असणार आहे. मोर्चा सिद्धिविनायकाच्या मंदिरावर नेण्यात येणार नाही, तो शिवाजीपार्क मैदानाजवळच असेल, या तरूणाईचा विजय आहे, तरूणांनी झेन जी यांनी मोठी सरकारच्या झिंझ्या उपटलेल्या आहेत. असं म्हणत त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर, राज ठाकरे यांनी पुढील मार्ग सांगितला. त्यांनी आज 25 जुलै 2026 रोजी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. 

ADVERTISEMENT

Raj Thackeray On Dharmendra Pradhan Resign
Raj Thackeray On Dharmendra Pradhan Resign
Google CTA

बातम्या हायलाइट

point

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर ठाकरे बंधूंचा मोर्चा काढणार?

point

ठाकरेंकडून मोठी घोषणा!

Raj Thackeray On Dharmendra Pradhan Resign : "उद्या शिवाजीपार्क मैदानाजवळ वीर सावरकर मार्गावर तिथेच व्यसपिठ असणार आहे. मोर्चा सिद्धिविनायकाच्या मंदिरावर नेण्यात येणार नाही, तो शिवाजीपार्क मैदानाजवळच असेल, या तरूणाईचा विजय आहे, तरूणांनी झेन जीने  सरकारच्या झिंझ्या उपटलेल्या आहेत," असं म्हणत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर, राज ठाकरे यांनी पुढील मार्ग सांगितला. त्यांनी आज 25 जुलै 2026 रोजी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. 

हे ही वाचा : प्रधानांच्या राजीनाम्यानंतर दिपकेची पहिली प्रतिक्रिया, सरकारकडे 'त्या' मागण्या

प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काय म्हणाले उद्धव ठाकरे? 

"गेली काही दिवस देश अस्वस्थ आहे, याचं कारण माहितीये. सर्वात आधी मी अभिजीत दिपके आणि सर्व विद्यार्थी तरूणांचं अभिनंदन करतो. यामध्ये त्यांच्या विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांनी देखील त्यांना पाठिंबा दिला होता. या तरुणांनी देशाला भयाच्या छायेतून बाहेर काढलं होतं. या देशात रोज काहीना काही दबाव देशात सुरू होता. या देशात लोक शिल्लकच राहिली नाहीत, या देशात जणु काही झुरळंच राहिली आहेत, असं सत्ताधाऱ्यांना वाटत होतं", असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

"या आंदोलनादरम्यान, भाजपचं विभित्स, गुन्हेगारी प्रवृत्तीचा चेहरा समोर आलाय. ज्यापद्धतीने तरूणांवर लाठीहल्ला केला, युवतीवर हल्ले करण्यात आले होते, त्यांच्या कपड्यांवर हात घातला गेला होता. पोलिसांनी विद्यार्थ्यांवर दंडुकेशाही केली होती, विनावरदीचे पोलीस घुसवले होते'," असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. यानंतर मोर्चाबाबत राज ठाकरे यांनी मुंबईच्या मार्चाबाबत सांगितलं.

हे ही वाचा : 'युवाशक्तीच्या एकजुटीचा मोठा विजय', प्रधानांच्या राजीनाम्यानंतर शरद पवारांचं ट्विट

राज ठाकरेंनी मोर्चाबाबत सांगितलं 

"उद्या शिवाजीपार्क मैदानाजवळ वीर सावरकर मार्गावर तिथेच व्यसपिठ असणार आहे. मोर्चा सिद्धिविनायकाच्या मंदिरावर नेण्यात येणार नाही, तो शिवाजीपार्क मैदानाजवळच असेल, या तरूणाईचा विजय आहे, तरूणांनी झेन जीने सरकारच्या झिंझ्या उपटलेल्या आहेत," असं म्हणत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर, राज ठाकरे यांनी सरकारवर खरमरीत टिका केली, नंतर अभिजीत दिपकेचं कौतुक केलं.