राज्यसभेसाठी नवनीत राणांची फिल्डिंग, सुनेत्रा पवार काय निर्णय घेणार?

मुंबई तक

नवनीत राणा राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक आहेत. त्यासाठी त्यांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यास त्यांनी सुरुवात केली आहे.

ADVERTISEMENT

google news

Rajya Sabha Election 2026 Update : सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यामुळे ही जागा रिक्त झालीय. याच जागेसाठी माजी खासदार नवनीत राणांनी मोर्चेबांधणी सुरु केल्याची चर्चा आहे. राज्यसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी नवनीत राणांनी प्रयत्न सुरु केल्याची माहिती समोर येते आहे. याचसाठी नवनीत राणांनी बुधवारी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांची भेट घेतल्याचंही कळतंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातील जागेवर उमेदवारी मिळावी यासाठी नवनीत राणांचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचीही नवनीत राणा आणि आमदार रवी राणांनी काल भेट घेतली. पुन्हा दिल्लीत जाण्यासाठी नवनीत राणांनी जोरदार प्रयत्न सुरु असल्याचंच या घडामोडींमधून दिसतंय.आपल्या कोट्यातील जागा राष्ट्रवादी भाजपच्या नवनीत राणांसाठी सोडणार का? पक्षातच आधी एवढी स्पर्धा असताना सुनेत्रा पवार कोणता निर्णय घेणार? की नवनीत राणा हाती घड्याळ घेणार याकडे लक्ष असेल.

हे वाचलं का?