लेकीचं मुलावर प्रेम, ओढणीनं गळा आवळून आईनं मुलीला संपवलं
Thane crime : ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमधून मन हेलावून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस येत आहे. आईने आपल्या मुलीची हत्या केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच, उल्हासनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी आईला अटक केली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
तरुणीचं मुलावर प्रेम आईला समजताच वाद
संतापलेल्या आईनं मुलीचा गळा आवळून संपवलं
Thane Crime : ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमधून मन हेलावून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस येत आहे. आईने आपल्या मुलीची हत्या केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच, उल्हासनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी आईला अटक केली आहे.
हे ही वाचा : Astrology : मंगळ ग्रहाचा मिथुन राशीत प्रवेश, 'या' राशींचे भाग्य उजळणार
तरुणीचं मुलावर प्रेम आईला समजताच वाद
पोलिसांच्या माहितीनुसार, अटक महिलेची आशा गरूड (वय 40) अशी ओळख समोर आलेली आहे. मृत तरुणीची अमृता गरुड (वय 19) अशी ओळख समोर आलेली आहे. प्राथमिक माहितीनुसार, मृत व्यक्तीचे एका तरूणासोबत प्रेमसंबंध होते. सांगण्यात येतंय की, रविवारी रात्री घरातील हॉलमध्ये आई आणि मुलीत वाद निर्माण झाला होता.
संतापलेल्या आईनं मुलीचा गळा आवळून संपवलं
दोघींमधील वाद इतका विकोपाला गेला की, रागाच्याभरात आशा गरूडने ओढणीने मुलीचा गळा आवळून तिची हत्या केली. घटनेनंतर कुटुंबात एकच खळबळ उडाली होती. मृत तरुणीच्या वडिलांनी आरोपी आईला पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला होता. नंतर आरोपी आईला ताब्यात घेत तिला अटक केली.
हे ही वाचा : E20 Janta Party कोणी बनवली? फॉलोअर्सचा अक्षरश: महापूर.. पण आता मागणी काय?
पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत प्रकरणाचा तपास सुरू ठेवला होता. या घटनेची माहिती उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष आव्हाड यांनी ही माहिती दिली.
