Astrology : मंगळ ग्रहाचा मिथुन राशीत प्रवेश, 'या' राशींचे भाग्य उजळणार
Astrology : ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा अधिपती मानल्या जाणाऱ्या मंगळ ग्रह हा 2 ऑगस्ट 2026 रोजी वृषभ राशीतून मिथून राशीत प्रवेश करणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ ग्रह हा व्यक्तीच्या जीवनात धैर्य, शौर्य, ऊर्जा आणि नेतृत्व यांचे प्रतीक आहे. या मोठ्या राशीतील बदलाचा प्रभाव सर्वच राशींवर होतो. मात्र, त्यापैकी काही राशी महत्त्वाच्या आहेत.
ADVERTISEMENT

1/5
ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा अधिपती मानल्या जाणाऱ्या मंगळ ग्रह हा 2 ऑगस्ट 2026 रोजी वृषभ राशीतून मिथून राशीत प्रवेश करणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ ग्रह हा व्यक्तीच्या जीवनात धैर्य, शौर्य, ऊर्जा आणि नेतृत्व यांचे प्रतीक आहे. या मोठ्या राशीतील बदलाचा प्रभाव सर्वच राशींवर होतो. मात्र, त्यापैकी काही राशी महत्त्वाच्या आहेत.

2/5
मेष
मंगळ ग्रहाचे संक्रमण हे मेष राशीसाठी अत्यंत अनुकूल असेल. नोकरदार व्यक्तींना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या दिल्या जाण्याची शक्यता आहे. बऱ्याच काळापासून पदोन्नती किंवा वेतनाची वाढ पाहत असाल, तर तु्म्हाला चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.

3/5
सिंह
सिंह राशीच्या लोकांना या संक्रमणामुळे प्रचंड मोठा फायदा होणार आहे. त्यांच्या करिअरमध्ये लक्षणीय प्रगती होईल. वरिष्ठांकडून मिळणाऱ्या प्रशंसामुळे आत्मविश्वास आणखी वाढेल. व्यावसायिकांना मोठा कारार किंवा नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता आहे.

4/5
तूळ
तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ भाग्यवान असणार आहे. प्रलंबित राहिलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना ही चांगली संधी आहे.

5/5
कुंभ
कुंभ राशीच्या व्यक्तींच्या मेहनतीचे फळ मिळेल आणि त्यांच्या करिअरमध्ये व्यवसायात अपेक्षित यश प्राप्त होईल. गुंतवणुकीतून मोठा आर्थिक फायदा होईल. वैयक्तिक जीवन, सुखी राहिल. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील.
