'आज मी कलंक पुसला...' ब्यूटी पार्लर चालवणाऱ्या पत्नीची हत्या, पती का झाला क्रूर?

मुंबई तक

उत्तर प्रदेशातील गाझीपूरमधील ब्युटी पार्लर चालवणाऱ्या एका महिलेची तिच्या नवऱ्याने निर्घृण हत्या केली. पोलिसांनी अटक केल्यानंतर 'आज मी कलंक पुसला' असं तो पोलिसांना म्हणाला.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

आज मी कलंक पुसला...

point

ब्यूटी पार्लर चालवणाऱ्या पत्नीची हत्या

point

पती का झाला क्रूर?

Crime News : छेडछाडीच्या आरोपावरून दिवसभर ठाण्यात बसवून ठेवल्यानंतर सोमवारी (27 जुलै) संध्याकाळी सुटका होताच एका पतीने आपल्या पत्नीची कोयत्याने गळा चिरुन हत्या केली. कुसुम असं मृत महिलेचं नाव आहे. ती ब्यूटी पार्लर चालवत असे. आरोपीने छेडछाडीचा आरोप करणाऱ्या पार्लरमधील दुसऱ्या महिला कर्मचाऱ्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र तिने जवळच्या रुग्णालयात धाव घेऊन स्वतःचा जीव वाचवला. या घटनेनंतर पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपीला अटक केली आहे. उत्तर प्रदेशातील गाझीपूर परिसरातील ही घटना आहे.

सहा महिन्यांच्या मुलाचं काय होणार?

30 वर्षीय कुसुम शर्मा हिचा विवाह आठ वर्षांपूर्वी झाला होता. मात्र, काही काळातच ती माहेरी परतली आणि अडीच वर्षांपूर्वी तिने 'हनी' नावाच्या तरुणाशी प्रेमविवाह केला. त्यांना सहा महिन्यांचा मुलगा आहे. हनी ऑर्केस्ट्रा चालवत असे, तर कुसुम भाड्याच्या जागेत ब्यूटी पार्लर चालवत होती. गेल्या काही दिवसांपासून हनी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने दोघांमध्ये वाद सुरू होते. यातच पार्लरमध्ये काम करणाऱ्या प्रिया नामक महिलेने हनीविरुद्ध छेडछाडीची तक्रार दाखल केली होती.

हे ही वाचा : भाजप नेत्यांच्या जेन-झी मुलींनी कसा दिला सरकारला रिअ‍ॅलिटी चेक?

'असा' केला हल्ला

या तक्रारीवरून पोलिसांनी सोमवारी हनीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. दिवसभराच्या चौकशीनंतर हा पती-पत्नीच्या वादातून झालेला खोटा आरोप असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी संध्याकाळी हनीला सोडून दिले. सुटल्यानंतर रात्री सातच्या सुमारास संतापलेला हनी थेट पार्लरमध्ये पोहोचला. कुसुम घराबाहेर पाणी आणण्यासाठी गेली असता त्याने तिच्यावर कोयत्याने वार करून तिचा खून केला. हनीने तक्रारदार प्रियावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु तिच्या कडेवर बाळ असल्याने तिने तेथून पळ काढून जीव वाचवला.

हे ही वाचा : पुणे : चार जणांसोबत संबंध, ठरलेली PG रुम आणि अत्याचाराची तक्रार

'आज मी कलंक पुसला'

हत्येनंतर आरोपी हातात कोयता हवेत फिरवत दहशत पसरवत होता आणि पळून जाणाऱ्या लोकांना भीती दाखवण्याचा प्रयत्न करत होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून पोलीस ठाण्यात त्याच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाचा लवलेशही नव्हता; उलट तो "आज मी कलंक पुसला" असे म्हणत हसत होता. स्थानिकांच्या माहितीनुसार कुसुमने याआधीही काही लोकांवर छेडछाडीचे गुन्हे दाखल केले होते. सध्या मृत महिलेच्या भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे.