पुणे : चार जणांसोबत संबंध, ठरलेली PG रुम आणि अत्याचाराची तक्रार

ओमकार वाबळे

पुण्यातील वाघोली भागात पीजी (PG) रूमवर 20 वर्षीय तरुणीवर चार जणांनी अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. या धक्कादायक गुन्ह्याचा सविस्तर तपशील आणि एफआयआरमधील माहिती.

ADVERTISEMENT

Pune Crime
Pune Crime
Google CTA

बातम्या हायलाइट

point

वाघोलीत 20 वर्षाच्या तरुणीसोबत काय घडलं?

point

चार जणांसोबत संबंध, ठरलेली PG रुम आणि अत्याचाराची तक्रार

Pune Crime : पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात शिकणाऱ्या 21 वर्षीय तरुणीवर तिच्याच ओळखीच्या मुलाने, त्याच्या भावाने आणि दोन मित्रांनी वेगवेगळ्या वेळी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून, या घटनेमुळे शहरात महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांत दाखल एफआयआरनुसार, पीडित तरुणीची सुरुवातीला फरहान नावाच्या 20 वर्षीय तरुणाशी ओळख झाली होती. त्यानंतर फरहानने तिला प्रपोज केले आणि पुढे फिरण्याच्या बहाण्याने एका पीजी रूमवर नेऊन तिच्यावर पहिल्यांदा अत्याचार केला.

लाँग ड्राइव्हच्या बहाण्याने...

यानंतर घडलेल्या प्रसंगांत फरहानच्या संगनमताने इतर आरोपींचा सहभाग समोर आला आहे. काही दिवसांनंतर लाँग ड्राईव्हच्या बहाण्याने नेऊन फरहान आणि त्याचा मित्र फजल शेख यांनी तरुणीला पुन्हा त्याच पीजी रूमवर नेले, जिथे फजलने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतरच्या एका प्रसंगात फरहान आणि त्याचा लहान भाऊ रेहान यांनी तरुणीला त्याच ठिकाणी नेऊन रेहानने तिच्या इच्छेविरोधात अत्याचार केला. या सर्व प्रकाराबाबत जाब विचारला असता आरोपींनी तिला 'जस्ट फॉर फन' असे उत्तर दिले, तसेच आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला.

हे ही वाचा : बदलापूर : अय्यंगार बेकरीतील केकमध्ये उंदराची विष्ठा, दोन मुलींसह नगरसेविका आजारी

चौघांनी केला अत्याचार

अत्याचाराची ही मालिका एवढ्यावरच थांबली नाही. डिसेंबर महिन्यात आरोपींनी पूर्ववैमनस्य किंवा मतभेद मिटवण्याच्या आणि पार्टी करण्याच्या बहाण्याने तरुणीला एका लॉजवर नेले. तिथे फरहानचा चौथा मित्र साहिल यानेही तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. अशा प्रकारे फरहान, त्याचा भाऊ रेहान, मित्र फजल आणि साहिल या चौघांनी वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या प्रसंगांत तरुणीचा मानसिक व शारीरिक छळ करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी या सर्व 18 ते 20 वयोगटातील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हे ही वाचा : Maharashtra Weather : राज्यातील 'या' जिल्ह्यांत पावसाचा धुमाकूळ, IMD चा मोठा अलर्ट

सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह

घडलेला संपूर्ण प्रकार अत्यंत गंभीर असून, एकाच ठिकाणी आणि वेगवेगळ्या टप्प्यांवर चार वेगवेगळ्या व्यक्तींनी एकाच तरुणीवर अत्याचार केल्याची बाब एफआयआरमधून स्पष्ट होत आहे. इतके दिवस हा प्रकार सुरू असताना पीडित तरुणीने आधी कोणाकडे वाच्यता का केली नाही, तिला काय धमक्या देण्यात आल्या होत्या आणि नेमक्या कोणत्या घटनेनंतर तिने पोलिसांत धाव घेतली, या सर्व बाजूंचा पोलीस सध्या सखोल तपास करत आहेत. या घटनेने शैक्षणिक केंद्र मानल्या जाणाऱ्या पुणे शहरात तरुणींच्या सुरक्षिततेबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.