देवेंद्र फडणवीसांची कर्जमाफी धुळफेक करणारी, शेतकरी का संतापले?

मुंबई तक

Farmers angry over state loan waiver scheme : राज्य सरकारच्या दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफी योजनेवर जालना जिल्ह्यातील अंतरवाला येथील शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कर्जमाफीच्या निकषांमुळे बहुतांश शेतकरी वंचित राहतील, असा आरोप त्यांनी केला.

ADVERTISEMENT

Farmers angry over state loan waiver scheme
Farmers angry over state loan waiver scheme
google news

बातम्या हायलाइट

point

देवेंद्र फडणवीसांची कर्जमाफी धुळफेक करणारी

point

शेतकरी का संतापले?

Farmers angry over state loan waiver scheme : राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंतच्या थकीत कर्जमाफीचा निर्णय घेतला असला, तरी या योजनेवर शेतकरी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत असल्याचे चित्र समोर आले आहे. जालना तालुक्यातील अंतरवाला येथे शेतकऱ्यांनी या निर्णयाविरोधात संतप्त प्रतिक्रिया देत सरकारच्या जीआरची होळी केली. कर्जमाफीच्या घोषणेनंतर सुरुवातीला आनंद झाला होता, मात्र प्रत्यक्ष जीआर वाचल्यानंतर ही योजना बहुतांश शेतकऱ्यांसाठी निरुपयोगी असल्याचे लक्षात आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. सरकारने जाहीर केलेल्या निकषांमुळे मोठ्या संख्येने शेतकरी लाभापासून वंचित राहतील, असा आरोप त्यांनी केला.

हेही वाचा : Ïmpact feature: WT20 महिला लीग : 'ठाणे स्कायरायझर्स'च्या जर्सीचे अनावरण महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते

शेतकऱ्यांची सरकारवर नाराजी 

यावेळी बोलताना अनेक शेतकऱ्यांनी सरकारवर थेट निशाणा साधला. 2019 नंतर कर्ज घेतलेल्या किंवा विविध निकषांमध्ये न बसणाऱ्या शेतकऱ्यांचे काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शेतीमालाला योग्य भाव मिळत नसताना, उत्पादन खर्च सातत्याने वाढत असताना आणि खत-बियाण्यांच्या किंमती वाढत असताना शेतकऱ्यांकडून कर्जफेडीची अपेक्षा का केली जाते, असा प्रश्नही त्यांनी विचारला. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, आर्थिक अडचणी आणि सामाजिक प्रश्नांकडे दुर्लक्ष करून केवळ घोषणाबाजी केली जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. सरकारने कर्जमाफीची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात ती शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

हेही वाचा : मुंबईची खबर : मुंबईकरांना पहिल्यांदा मिळणार 'ही' गोष्ट, जाणून घ्या सविस्तर

हे वाचलं का?