नागपूर : ‘मम्मी-पप्पा सॉरी..’, मी पुन्हा NEET..,स्नेहासोबत काय घडलं?

योगेश पांडे

neet student suicide case : नीट परीक्षा रद्द झाल्यामुळे आलेल्या नैराश्यातून नागपुरात राहणाऱ्या मध्य प्रदेशातील एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली.

ADVERTISEMENT

neet student suicide case
neet student suicide case
google news

बातम्या हायलाइट

point

नागपूर : ‘मम्मी-पप्पा सॉरी..’,

point

मी पुन्हा NEET..,स्नेहासोबत काय घडलं?

neet student suicide case :  देशात सध्या 'नीट' (NEET) परीक्षेतील गैरप्रकार आणि पेपर लीक प्रकरणावरून मोठा गदारोळ सुरू असतानाच, नागपुरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावणारी बातमी समोर आली आहे. नीट परीक्षा दिल्यानंतर ती रद्द झाल्यामुळे आलेल्या नैराश्यातून नागपूरमध्ये एका विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, परीक्षेच्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर किती गंभीर परिणाम होत आहेत, हे पुन्हा एकदा समोर आले आहे.

हेही वाचा : ऑफिसमध्येच मर्डर, सहकाऱ्याने क्रूरपणे संपवलं; निष्पाप तरुणीसोबत काय घडलं?

NEET च्या तयारीसाठी नागपुरात आली 

आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आकांक्षा उर्फ स्नेहा चतुर्वेदी असे असून, ती मूळची मध्य प्रदेशातील मऊगंज येथील रहिवासी होती. आकांक्षा गेल्या काही वर्षांपासून आपल्या आई-वडिलांसोबत आणि भावासोबत नागपुरातील अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या अजय नगर भागात राहत होती. आपल्या स्वप्नांची पूर्ती करण्यासाठी ती नागपुरात राहून अभ्यासावर लक्ष केंद्रित करत होती, मात्र परीक्षेबाबतच्या अनिश्चिततेने तिचे आयुष्यच हिरावून नेले आहे. तिच्या या अचानक जाण्याने चतुर्वेदी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

हेही वाचा : लग्न ठरलेल्या प्रेयसीला धमकी द्यायला गेला अन् फसला, 24 वर्षीय तरुणासोबत काय झालं?

हे वाचलं का?