IAS मुंढे इफेक्ट! गुटखा कसा बनतो? चालू फॅक्टरीवर धाड, आरोपी पसार अन्..VIDEO

मुंबई तक

Akola gutkha factory raid : अकोल्यातील एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या गुटखा निर्मिती कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाने धाड टाकत मोठी कारवाई केली. सुमारे 50 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून मुख्य आरोपी फरार आहे.

ADVERTISEMENT

Akola gutkha factory raid
Akola gutkha factory raid
Google CTA

बातम्या हायलाइट

point

IAS मुंढे इफेक्ट! गुटखा कसा बनतो? चालू फॅक्टरीवर धाड,

point

आरोपी पसार अन्..VIDEO

Akola gutkha factory raid, धनंजय साबळे : राज्यात 2012 पासून गुटखाबंदी लागू असली तरी अनेक ठिकाणी गुटखा सहज उपलब्ध होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. अशातच अकोल्यातील एमआयडीसी परिसरात चक्क गुटखा तयार केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अन्न व औषध प्रशासनाने गुप्त माहितीच्या आधारे या ठिकाणी छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत गुटखा तयार करण्यासाठी वापरले जाणारे कच्चे साहित्य, पॅकिंगसाठी लागणारी लेबले, सुपारी, तंबाखू तसेच पॅकिंग मशीन असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांच्या प्राथमिक अंदाजानुसार जप्त करण्यात आलेल्या साहित्याची किंमत सुमारे 50 लाख रुपये असण्याची शक्यता असून त्याची मोजणी अद्याप सुरू आहे.

हेही वाचा : Personal Finance: जमीन गुंठ्यात कशी मोजायची? गुंठेवारी न पाहता जमीन खरेदीचा विचारही नको!

दोन दिवस संबंधित ठिकाणी पाळत ठेवली अन् मोठी कारवाई 

या कारवाईबाबत माहिती देताना अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन दिवसांपूर्वी या ठिकाणी बेकायदेशीर कारखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतर दोन दिवस संबंधित ठिकाणी पाळत ठेवण्यात आली. अधिकारी संख्या कमी असल्यामुळे वाशिम आणि अमरावती येथील अधिकाऱ्यांची मदत घेण्यात आली. सकाळी साडेनऊच्या सुमारास छापा टाकण्यात आला असता कारखाना सुरू असल्याचे आढळून आले. त्या वेळी तीन कामगार प्रत्यक्ष काम करत होते. चौकशीदरम्यान त्यांनी हा संपूर्ण कारभार गौरव शर्मा नावाचा व्यक्ती चालवत असल्याचे सांगितले. घटनास्थळी गुटखा तयार करण्यासाठी वापरले जाणारे यंत्रसामग्री, कच्चा माल आणि पॅकिंग साहित्य मोठ्या प्रमाणावर आढळून आले.

हेही वाचा : आधी पवार शिंदेंना भेटले, आता रात्री पाटील 'नंदनवन'वर.. 45 मिनिटांची बैठक अन् चक्रावणारं राजकारण

हे वाचलं का?