ऑफिसमध्येच मर्डर, सहकाऱ्याने क्रूरपणे संपवलं; निष्पाप तरुणीसोबत काय घडलं?
Crime News : ऑफिसमध्येच एका तरुणीची हत्या करण्यात आलीये. सहकारी आणि एक्स बॉयफ्रेंडने क्रूरपणे तिला संपवलंय. नेमकं काय घडलंय? जाणून घेऊयात...
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
ऑफिसमध्येच मर्डर, सहकाऱ्याने क्रूरपणे संपवलं
निष्पाप तरुणीसोबत काय घडलं?
Crime News : एका महिलेची तिच्याच एक्स बॉयफ्रेंडने कार्यालयात घुसून चाकूने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका खासगी पॅकर्स अँड मूवर्स कंपनीच्या कार्यालयात ही भीषण घटना घडली. डिंपल असे मृत महिलेचे नाव असून ती याच कंपनीत कार्यरत होती. या घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे समोर आला आहे.
हेही वाचा : Personal Finance: 'ही' कागदपत्रं नसतील तर चुकूनही घेऊ नका ती जमीन, नाहीतर…
ब्रेकअप झाल्यानंतर पॅचअपसाठी करत होता प्रयत्न
या प्रकरणात आरोपीचे नाव हरविंदर मान उर्फ हॅरी असे असून, तो डिंपलचा एक्स बॉयफ्रेंड आणि सहकारी देखील होता. डिंपल आणि हरविंदर गेल्या तीन वर्षांपासून एकाच कार्यालयात काम करत होते आणि पूर्वी ते एकमेकांच्या रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, सुमारे सहा महिन्यांपूर्वी त्यांच्यातील हे नाते संपुष्टात आले होते. ब्रेकअप झाल्यानंतर डिंपलने हरविंदरपासून पूर्णपणे दुरावा ठेवला होता, परंतु हरविंदर मात्र सतत डिंपलवर पुन्हा रिलेशनशिपमध्ये येण्यासाठी दबाव टाकत होता आणि तिला मनवण्यासाठी प्रयत्न करत होता.
हेही वाचा : महायुती 6 जागांवर बिनविरोध! तनपुरेंच्या जागेवर मात्र ड्रामा, विधानपरिषदेच्या 17 लढती एका क्लिकवर









