महायुती 6 जागांवर बिनविरोध! तनपुरेंच्या जागेवर मात्र ड्रामा, विधानपरिषदेच्या 17 लढती एका क्लिकवर
Vidhan Parishad Election 2026 : विधानपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीच्या 6 जागा बिनविरोध निवडून येणार असल्याचं स्पष्ट झालंय. मात्र, प्राजक्त तनपुरेंच्या जागेवर ड्रामा पाहायला मिळतोय. उर्वरित 11 जागांवर कोण- कोणाविरोधात लढणार? याबाबतची माहिती जाणून घेऊयात...
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
महायुती 6 जागांवर बिनविरोध! तनपुरेंच्या जागेवर मात्र ड्रामा
विधानपरिषदेच्या 17 लढती एका क्लिकवर
Vidhan Parishad Election 2026 : महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी पार पडत असलेल्या निवडणुकीचं चित्र आता स्पष्ट झालंय. या निवडणुकीसाठी 18 जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे. आज म्हणजे गुरुवार (दि.4) निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. महायुतीच्या नेत्यांनी ताकद लावल्यानंतर 6 जागा बिनविरोध करण्यात त्यांना यश आलंय. मात्र, उर्वरित 11 जागांवर लढत होणार आहेत. कोणत्या जागा बिनविरोध झाल्या? कोणत्या जागांवर कोणा-विरोधात कोण लढणार? याची माहिती जाणून घेऊयात..
हेही वाचा : 'कपडे हो गए छोटे...' Video झाला व्हायरल अन् अनिताने LIVE येऊन घेतलं विष!
महायुतीच्या बिनविरोध जागा
1.वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर : अरुण लखाणी
2.पुणे: विक्रम काकडे
3.ठाणे :रवींद्र फाटक
4.रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग : अनिकेत तटकरे
5.यवतमाळ - दुष्यंत चतुर्वेदी ( शिवसेना शिंदे गट)
6 अहिल्यानगर – प्राजक्त तनपुरे – भाजप (होण्याची शक्यता, अपक्षाचा खोटी सही घेऊन अर्ज माघारी घेतल्याचा आरोप)
दरम्यान, सध्या अहिल्यानगरची जागा बिनविरोध झाली असली तरी अपक्ष उमेदवाराने आक्षेप घेतलाय. उमेदवारी मागे घेण्याच्या अर्जावर सुचकाची सही खोटी केल्याचा दावा केलाय.. अपक्ष उमेदवाराने थेट जिल्हाधिकार्यांसमोर आत्महत्येचा इशारा दिलाय.. अहिल्यानगरचे अपक्ष उमेदवार दत्ता पानसरे यांनी थेट जिल्हाधिकार्यांसमोर आत्महत्येचा इशारा दिला आहे. पानसरे यांच्या उमेदवारी माघारीसाठी एका सुचकाने अर्ज दाखल केला होता. मात्र, "माझा अर्ज मागे घेण्यासाठी सुचकाची जी सही वापरण्यात आली, ती पूर्णपणे खोटी आहे," असा गंभीर आरोप दत्ता पानसरे यांनी केला आहे.









