'कपडे हो गए छोटे...' Video झाला व्हायरल अन् अनिताने LIVE येऊन घेतलं विष!

मुंबई तक

एका सुप्रसिद्ध रीलस्टारविषयी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका रीलवरुन ट्रोल झाल्याने या महिला रीलस्टारने टोकाचा निर्णय घेतला.

ADVERTISEMENT

Reel star Anita Bishnoi
Reel star Anita Bishnoi
google news

बातम्या हायलाइट

point

'कपडे हो गए छोटे...'

point

Video झाला व्हायरल अन्

point

अनिताने LIVE येऊन घेतलं विष!

Reel star Anita Bishnoi : आजच्या काळात सोशल मीडिया हे स्वतःची ओळख निर्माण करण्याचे आणि विचार मांडण्याचे एक मोठे माध्यम बनले आहे. इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूब सारख्या प्लॅटफॉर्मवर रील्स बनवून अनेक क्रिएटर्स रातोरात प्रसिद्ध होतात. मात्र, या लोकप्रियतेसोबतच त्यांना अनेकदा ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. सध्या राजस्थानमधील जोधपूर येथील प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर अनिता बिश्नोई यांच्यासोबत अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. 10 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स असलेल्या अनिता यांनी एका व्हिडिओमध्ये महिलांच्या पाश्चात्य पेहरावावर भाष्य करताना, "कपडे झाले लहान तर लाज कुठून येणार..., पोळी झाली ब्रेड तर ताकद कुठून येणार..." असे म्हटले होते. हा व्हिडिओ व्हायरल होताच युजर्समध्ये दोन गट पडले आणि अनिता यांच्यावर नकारात्मक कमेंट्सचा पाऊस पडत वाद कमालीचा चिघळला.

'ट्रोलिंगला कंटाळून विष प्राशन'

सतत होणाऱ्या ट्रोलिंग आणि मानसिक त्रासाला कंटाळून अखेर अनिता बिश्नोई यांनी इंस्टाग्रामवर थेट (लाइव्ह) येत आपली व्यथा मांडली. लाईव्ह दरम्यान त्यांनी अत्यंत भावूक होत आरोप केला की, काही लोक त्यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा आणि मानसिक छळ करण्याचा प्रयत्न करत आहेत. जर कोणाला तक्रार असेल तर त्यांनी समोर येऊन बोलावे, कायदा आपले काम करेल, असे आव्हान त्यांनी ट्रोलर्सना दिले. अनिता यांचे पती दिनेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते घराबाहेर असताना अनिता इंस्टाग्रामवर लाईव्ह येऊन एका दुसऱ्या इन्फ्लुएंसरवर त्रास देत असल्याचा आरोप करत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर काही वेळातच त्यांच्या मुलाचा फोन आला आणि त्याने सांगितले की, अनिता यांनी विषारी पदार्थ प्राशन केला आहे.

हे ही वाचा : पार्टीत ‘तो’ टीशर्ट घातल्याने ट्रोलिंग, अखेर रितेश देशमुखने मागितली माफी; म्हणाला...

नवरा पोलिसांत दाखल करणार तक्रार

या धक्कादायक घटनेनंतर कुटुंबीयांनी अनिता यांना तातडीने जोधपूरच्या एमडीएम (MDM) रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांना अतिदक्षता विभागात (ICU) भरती करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या अनिता यांची प्रकृती स्थिर असून त्या धोक्याबाहेर आहेत, मात्र डॉक्टर त्यांची देखरेख करत आहेत. दुसरीकडे, अनिता यांचे पती दिनेश यांनी गंभीर आरोप केला आहे की, एक सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अनिता यांना सतत ट्रोल करत होता आणि इतर क्रिएटर्सनाही त्यांच्याविरुद्ध भडकावत होता. तसेच त्यांच्या कुटुंबालाही धमक्या दिल्या जात होत्या. याप्रकरणी ते आता पोलिसांत अधिकृत तक्रार दाखल करणार आहेत.

हे ही वाचा : धड शेतात अन् मुंडकं नदीत, नवऱ्याला संपवताना बायको बघत बसली; नेमकं कारण काय?

 

हे वाचलं का?