Govt Jobs : पदवीधरांना रेल्वेत नोकरीची संधी, सेक्शन कंट्रोलर पदांसाठी भरती सुरु, लगेच करा अर्ज
रेल्वेत सेक्शन कंट्रोलर पदांसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पदवीधरांसाठी ही सुवर्णसंधी आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 14 ऑगस्ट आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पदवीधरांना रेल्वेत नोकरीची संधी
सेक्शन कंट्रोलर पदांसाठी भरती सुरु
लगेच करा अर्ज
Section Controller Recruitment : भारतीय रेल्वेत सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी तरुणांसाठी चालून आली आहे. रेल्वे भरती बोर्डाकडून (RRB) सेक्शन कंट्रोलर पदांसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 119 रिक्त जागांवर ही भरती केली जाणार आहे. या पदासाठी देशभरातून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. रेल्वे विभागात करिअर करू इच्छिणाऱ्या आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे.
पात्रतेचे निकष काय?
या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवीअसणे आवश्यक आहे. वयोमर्यादेचा विचार केला तर 1 जुलै 2026 रोजी उमेदवाराचे वय 20 ते 33 वर्षांच्या दरम्यान असावे. यामध्ये राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयात सवलत देण्यात आली आहे, ज्यामध्ये अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे, तर इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांना 3 वर्षांची सवलत लागू असेल.
हे ही वाचा : मुंबईची खबर : एसी लोकलसंबंधी मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, जाणून घ्या सविस्तर
अर्जाचे शुल्क किती?
या पदासाठी निवड होणाऱ्या उमेदवारांना संपूर्ण भारतात कुठेही नियुक्ती (नोकरीचे ठिकाण) दिली जाऊ शकते. अर्ज प्रक्रियेसाठी लागणारे परीक्षा शुल्क प्रवर्गानुसार ठरवण्यात आले आहे. सामान्य (General), ओबीसी (OBC) आणि ईडब्ल्यूएस (EWS) प्रवर्गातील उमेदवारांसाठी 500 रुपये शुल्क असून, अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), माजी सैनिक, ट्रान्सजेंडर, ईबीसी (EBC) आणि महिला उमेदवारांसाठी 250 रुपये परीक्षा शुल्क निश्चित करण्यात आले आहे.
हे ही वाचा : Devendra Fadanvis : '48 हजार कोटी रूपयांपर्यंतचे शेतकऱ्यांचे बिल माफ', मुख्यमंत्र्यांची घोषणा
अर्जाची अंतिम मुदत
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 ऑगस्ट आहे. त्यामुळे उमेदवारांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता वेळेत आपले अर्ज सादर करावेत. अधिकृत संकेतस्थळाला (cr.indianrailways.gov.in) भेट देऊन शैक्षणिक पात्रता, वयाची अट आणि इतर सविस्तर नियमांची पडताळणी करूनच उमेदवारांनी आपले अर्ज निश्चित करावेत.










