दुधातील भेसळ कशी ओळखाल? काय पाहायचं? तुकाराम मुंडेंचा महत्त्वाचा सल्ला
tukaram mundhe exclusive : मुंबई Tak ला दिलेल्या मुलाखतीत तुकाराम मुंढे यांनी दुधातील भेसळीचे धक्कादायक प्रकार, सिंथेटिक दूध रॅकेट आणि कठोर कारवाईबाबत सविस्तर भूमिका मांडली. ग्राहकांनी केवळ ब्रँडवर विश्वास न ठेवता दुधाची माहिती तपासूनच खरेदी करावी, असे आवाहन त्यांनी केले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
दुधातील भेसळ कशी ओळखाल?
तुकाराम मुंडेंनी काय सांगितलं?
tukaram mundhe exclusive : महाराष्ट्रात अन्नभेसळ, बनावट उत्पादने आणि ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करणारे अधिकारी म्हणून तुकाराम मुंढे पुन्हा चर्चेत आले आहेत. मुंबई Tak ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी अन्नसुरक्षा कायद्याची अंमलबजावणी, दुधातील भेसळ, ग्राहकांची जबाबदारी आणि प्रशासनाची भूमिका यावर सविस्तर भाष्य केले. विशेषतः दुधातील भेसळीचे वाढते प्रकार अत्यंत गंभीर आणि भीतीदायक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नवजात बालकापासून लहान मुलांपर्यंत दूध हा प्रमुख आहार असल्याने त्यामध्ये होणारी भेसळ ही थेट जनतेच्या आरोग्यावर परिणाम करणारी बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा : Maharashtra Weather : मुंबईसह काही ठिकाणी पावसाची स्थिती, IMD विभागाचा अंदाज
भेसळ करण्यासाठी शॅम्पू, साबण आणि डिटर्जंटचाही वापर
तुकाराम मुंढे यांनी काही दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या मोठ्या दुधाच्या रॅकेटचा उल्लेख करताना, त्यामध्ये सिंथेटिक दूध तयार करण्यासाठी पाम ऑईल, इतर तेल, स्किम मिल्क पावडर आणि विविध रसायनांचा वापर होत असल्याचे सांगितले. काही ठिकाणी शॅम्पू, साबण आणि डिटर्जंटचाही वापर करण्यात आल्याचे तपासात समोर आल्याचे त्यांनी सांगितले. अशा प्रकारे तयार होणाऱ्या कृत्रिम दुधाची उत्पादन किंमत गायीच्या दुधासाठी सुमारे 15 रुपये प्रतिलिटर आणि म्हशीच्या दुधासाठी सुमारे 30 रुपये प्रतिलिटर इतकी असल्याचे त्यांनी नमूद केले. हे दूध म्हणजे विषच बाजारात विकले जात असून, केवळ नफा कमावण्यासाठी लोकांच्या आरोग्याशी खेळ केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. अशा प्रकारचे कृत्य दहशतवाद्यांपेक्षाही कमी नसल्याचे कठोर शब्दांत त्यांनी मत व्यक्त केले.
हेही वाचा : Exclusive: ...तर थेट जन्मठेप! तुकाराम मुंढेंचा मोठा इशारा, दूधात भेसळ करायचा विचार विसरून जा!










