Maharashtra Weather : वातावरण फिरलं, काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट, IMD चा अंदाज

मुंबई तक

Maharashtra Weather : राज्यातील काही विभागांत कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्टचा अंदाज दिलेला आहे. अशातच जाणून घ्या एकूण हवामान विभागाचा अंदाज, पुढीलप्रमाणे... 

ADVERTISEMENT

Maharashtra Weather (AI Generated)
Maharashtra Weather
Google CTA

बातम्या हायलाइट

point

काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट

point

जाणून घ्या एकूण हवामान विभागाचा अंदाज

Maharashtra Weather : राज्यात काही दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याचं चित्र आहे. राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे, तर काही विभागांत कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्टचा अंदाज दिलेला आहे. अशातच जाणून घ्या एकूण हवामान विभागाचा अंदाज, पुढीलप्रमाणे... 

हे ही वाचा : पालघरमध्ये खाकी वर्दीला बट्टा, 56 वर्षीय पोलिसाचा 13 वर्षीय मुलीवर विनयभंग

कोकण 

पालघर जिल्ह्यांत हलक्या पावसाचा अंदाज आहे. ठाणे, रायगड या दोन जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट वर्तवण्यात आलेला आहे. मुंबई आणि  रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांत हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

उत्तर महाराष्ट्र 

उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता आहे. नाशिक आणि जळगाव या दोन जिल्ह्यांत हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. नाशिक घाटमाथा आणि अहिल्यानगर परिसरात पावसाचा यलो अलर्टचा अंदाज आहे. 

पश्चिम महाराष्ट्र 

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा घाटमाथा परिसरात हलका ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. पुणे घाटमाथा परिसरात पावसाचा यलो अलर्टचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे. 

हे वाचलं का?