जालना: मुलगा अंध जन्मल्याचा राग, नवऱ्यासह सासूने दोघांना विहिरीत फेकलं
Jalna crime : सासू आणि पतीने आपल्या अंध पत्नीसह आपल्या साडेतीन वर्षांच्या मुलाला विहिरीत फेकून दिले. या घटनेत मुलाचा मृत्यू झाला असून महिला गंभीरपणे जखमी झाली आहे. ही घटना जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगाव येथे घडली आहे, या घटनेनं गाव हादरून गेले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
विहिरीत आई आणि मुलाला फेकून दिलं
बाळाला अंधत्व येऊनही जन्म देण्याचा निर्णय
Jalna Crime : मनीष जोग - सासू आणि पतीने आपल्या अंध पत्नीसह आपल्या साडेतीन वर्षांच्या मुलाला विहिरीत फेकून दिले. या घटनेत मुलाचा मृत्यू झाला असून महिला गंभीरपणे जखमी झाली आहे. ही घटना जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगाव येथे घडली आहे. या घटनेनं गाव हादरून गेले आहे. या घटनेनं गावात एकच खळबळ उडाली आहे. जखमी महिलेची सरस्वती पाटील, पतीची स्वप्नील पाटील, तर सासूची ओळख आशाबाई पाटील तसेच मृत मुलाची कृष्णा पाटील अशी ओळख समोर आली.
हे ही वाचा : तरुणाने प्रेयसीचा गळा चिरला, स्वत: रेल्वेखाली उडी मारत संपवलं जीवन; मृतदेहाचे दोन तुकडे
विहिरीत आई आणि मुलाला फेकून दिलं
या घटनेची माहिती पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. संबंधित प्रकरणाचा शोध देखील घेतला, विहिरीत महिला आणि एक मुलगा पडल्याचे आढळून आले होते. बचावकार्य पथकाने दोघांनाही बाहेर करण्याचे काम केले. तेव्हा मुलाचा मृत्यू झाला, तर आई गंभीर जखमी झाली होती. आई मुलगा अंध असल्याने हा अपघात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.
बाळाला अंधत्व येऊनही जन्म देण्याचा निर्णय
साडेतीन वर्षांचा मुलगा हा अंध होता, त्याची आई सरस्वती पाटील ही देखील अंधच आहे. सरस्वती पाटील जेव्हा गर्भवती होत्या, तेव्हा त्यांनी सोनेग्राफी केल्यानंतर पोटात अंध बाळ असल्याची माहिती मिळाली. सरस्वती यांनी त्या बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. आज तेच बाळ साडेतीन वर्षांचं झालं आहे. तरीही त्यावरून कुटुंबीयांच्या मनात राग होताच.
हे ही वाचा : बायकोनं गरीब नवऱ्याच्या डोक्यात मोबाईल घातला, कोच पडून भळाभळा रक्त, अखेर दुर्दैवी अंत
दरम्यान, नवरा-बायकोमध्ये मागील काही महिन्यांपासून कलह सुरू होता. याच कारणातून पती आणि सासूने दोघांनाही विहिरीत ढकलून दिले. मात्र, साडे तीन वर्षांच्या कृष्णाचा दुर्दैवी अंत झाला. पोलिसांनी नवरा स्वप्नील पाटील आणि सासू आशाबाई पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांना त्यांना ताब्यात घेतला. या घटनेचा अधिकचा तपास सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.










