टायगर श्रॉफवर हल्ला करणारे आरोपी अल्पवयीन? देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगितलं?

टायगर श्रॉफ याच्या कारवर मुंबईतील जुहू येथे गोळीबार झाला. गोळीबार करणारे आरोपी अल्पवयीन आहेत का? याविषयी फडणवीसांना काय सांगितलं?

ADVERTISEMENT

Devendra Fadnavis On Tiger Shroff Firing
Devendra Fadnavis On Tiger Shroff Firing
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

अभिनेता टायगर श्रॉफ याच्या कारवर गोळीबार

point

लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी

point

आरोपी अल्पवयीन होते का?

Devendra Fadnavis On Tiger Shroff Firing : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्या कारवर मुंबईतील जुहू येथे गोळीबार झाला. यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँग पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या हल्ल्याची जबाबदारी या गँगने स्वीकारली आहे. परदेशात लपून बसलेले गुंड अनिल पंडित आणि हरमन संधू यांनी एका सोशल मीडिया पोस्टद्वारे ही जबाबदारी स्वीकारली. यानंतर आज मुख्यमंत्री फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी टायगर श्रॉफवर हल्ला करणारे आरोपी अल्पवयीन आहेत का याविषयी काय सांगितलं, जाणून घेऊया. 

'गँग म्हणजे डरपोक लोकांचं कार्य'

माध्यमांशी लॉरेन्स बिश्नोई गँगविषयी बोलताना फडणवीस म्हणाले की, ' या ज्या गँग वगैरे आहेत हे म्हणजे डरपोक लोकांचं कार्य आहे. हे घाबरट लोक आहेत. हे कुठंतरी लपून बसतात आणि तिथून कम्युनिकेशन माध्यमचा उपयोग करुन धमक्या देत असतात. प्रत्येक धमकी आम्ही गांभीर्याने घेतो. आणि त्याच्यावर कारवाई करतो. मी आश्वस्त करु इच्छितो मुंबई पोलीस हे प्रोफेशनल पोलीस आहेत. आजपर्यंत मुंबई पोलिसांनी दाखवून दिलंय की अशा प्रकारच्या गुन्हेगारांना मुंबई पोलीस जेरबंद केल्याशिवाय रहात नाहीत. तेव्हा निश्चितपणे याच्यावरही कारवाई होईल. कोणीही घाबरण्याचं कारण नाही.'

हे ही वाचा : गोळी लागली नाही, तरीही टायगरचा हात का भाजला? एकनाथ शिंदेंनी सांगितलं...

आरोपी अल्पवयीन आहेत का?

ज्यांनी हल्ला केला ते आरोपी अल्पवयीन आहेत का याविषयी बोलताना फडणवीस म्हणाले की, 'अजून मायनर (अल्पवयीन) म्हणता येणार नाहीत. आरोपी कोण आहेत याचे साधारण धागेदोरे हे पोलिसांनी आयडेन्टीफाय केले आहेत.' तसंच ते म्हणाले की, 'रात्रीतूनच जे आरोपी आहेत त्यांचं आयडेन्टीफिकेशन करण्यात आलं आहे. त्यांच्या संदर्भातील प्रमुख धागेदोरे हे पोलिसांना प्राप्त झाले आहेत. कुठल्याही परिस्थितीत पोलीस आरोपींना शोधून काढतील आणि त्यांच्यावर कारवाई करतील.'

हे ही वाचा : टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर वडील जॅकी श्रॉफ यांची प्रतिक्रिया आली समोर, नेमकं काय म्हणाले?

मुंबई पोलिसांविषयी काय म्हणाले?

पुढं ते म्हणाले की, 'या आरोपींच्या पाठीशी कोण आहे त्यांनाही शोधून काढण्याचं काम पोलीस करतील. मागच्या काळातही अशा पद्धतीनं या लोकांनी जेव्हा प्रयत्न केला त्याही वेळी मुंबई पोलिसांनी आरोपी शोधून काढले आणि त्यांचे जे आका होते ते ही शोधून काढले. त्यामुळे मी निश्चितपणे सांगतो कुठल्याही परिस्थितीत अशा प्रकारच्या घटना सहन केल्या जाणार नाहीत. आणि  मुंबई पोलीस निश्चितपणे या आरोपींना शोधून काढतील.'