"1 किलो पनीरसाठी 5-6 लीटर दूध लागतं; मग 200 रुपयांमध्ये पनीर कसं मिळतं?"

मुंबई तक

tukaram mundhe on paneer adulteration : 300 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळणारे पनीर सुरक्षित असू शकत नाही, असा गंभीर इशारा तुकाराम मुंढे यांनी दिला. पनीरमधील भेसळ, हॉटेलमधील अस्वच्छता आणि अन्नसुरक्षेबाबत त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली.

ADVERTISEMENT

tukaram mundhe on paneer adulteration
tukaram mundhe on paneer adulteration
Google CTA

बातम्या हायलाइट

point

"1 किलो पनीरसाठी 5-6 लीटर दूध लागतं; मग 200 रुपयांमध्ये पनीर कसं मिळतं?"

point

300 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळणारे पनीर सुरक्षित असू शकत नाही, तुकाराम मुंढेेंचा इशारा

tukaram mundhe on paneer adulteration : पनीरच्या नावाखाली ग्राहकांच्या आरोग्याशी मोठा खेळ सुरू असल्याचा गंभीर इशारा अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. एका राष्ट्रीय अहवालाचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, देशात जितक्या प्रमाणात दूधाचे उत्पादन होत नाही, त्यापेक्षा अधिक प्रमाणात दूधाची विक्री होत असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत बाजारात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असणारे पनीर नेमके कुठून येते, हा प्रश्न प्रत्येक ग्राहकाने स्वतःला विचारण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. पनीर तयार करण्यासाठी साधारणपणे पाच ते सहा लिटर दूध लागते. दूधाचा दर प्रतिलिटर 60 रुपये गृहीत धरला, तरी केवळ दुधाची किंमतच सुमारे 300 ते 350 रुपये होते. त्यानंतर प्रक्रिया, पॅकेजिंग, ब्रँडिंग आणि इतर खर्च धरल्यास पनीरची किंमत 400 रुपयांपेक्षा कमी असणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे बाजारात 200 ते 250 रुपयांत मिळणारे पनीर सुरक्षित असू शकत नाही आणि त्यामध्ये निश्चितच भेसळ असण्याची शक्यता असल्याचा इशारा त्यांनी दिला.

हेही वाचा : सुनेत्रा पवारांसमोर अडचण, एक नोटीस आणि NCPचं राष्ट्रीय अध्यक्षपद जाणार?

'पनीर हे शंभर टक्के दूधापासून तयार होते'

अधिकारी तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, पनीर हे शंभर टक्के दूधापासून तयार होणारे दुग्धजन्य उत्पादन आहे आणि त्यामध्ये अन्य कोणत्याही पदार्थाला स्थान नसावे. मात्र, स्वस्त दरात मिळणाऱ्या पनीरमध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ केली जात असल्याचे तपासणीत समोर आले आहे. गेल्या वर्षभरात करण्यात आलेल्या तपासणीत जवळपास 40 टक्के पनीरमध्ये भेसळ आढळून आल्याचा दावा त्यांनी केला. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात रसायनांचाही वापर आढळल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे केवळ स्वस्त असल्यामुळे असे पनीर खरेदी करणे धोकादायक ठरू शकते. अशा संशयास्पद पदार्थांचे सेवन करण्यापेक्षा ते न खाणेच अधिक योग्य असल्याचे सांगत त्यांनी ग्राहकांनी किंमतीच्या मोहापेक्षा आरोग्याला प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले.

हेही वाचा : Personal Finance: इथेनॉलची मागणी वाढणार, आता ‘त्या’ कंपन्यांचे शेअर्स खरेदी करावे का?

हे वाचलं का?