जेजुरी अपघातातील मृत वारकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाखांची मदत; मुख्यमंत्र्यांची घोषणा
cm devendra fadnavis on jejuri accident : जेजुरीजवळ टेम्पोच्या धडकेत तीन वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
जेजुरी अपघातातील मृत वारकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाखांची मदत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा
cm devendra fadnavis on jejuri accident : जेजुरीजवळ झालेल्या भीषण अपघातात तीन वारकऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबीयांसाठी आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात जेजुरीजवळ टेम्पोने वारकऱ्यांना धडक दिल्याने हा अपघात घडला. या दुर्घटनेत सहा वारकरी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली होती. त्यापैकी तीन वारकऱ्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. उर्वरित जखमी वारकऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा : Astrology : शनीदेवाची उलटी चाल, 'या' राशींच्या लोकांवर संकट ओढावणार
राज्य सरकारतर्फे प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त करत मृत वारकऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. अपघातातील जखमी वारकऱ्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर आवश्यक उपचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी रवाना झाले असून संपूर्ण परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात असल्याचेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले. तसेच या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या वारकऱ्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारतर्फे प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल, अशी घोषणा त्यांनी केली.
हेही वाचा : 'सेव्हन स्टारमध्ये नेते आणि चेलेच.., ही सेवा नाही तर मेवा' राजदीप सरदेसाईंनी केली पोलखोल!










