'कायदा सर्वांना समान', चुकीच्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींना तुकाराम मुंढेंचा इशारा

मुंबई तक

tukaram mundhe warning on misleading advertisements : चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाणार असल्याचे अधिकारी तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले. उत्पादनाची जाहिरात करण्यापूर्वी त्याची वैधता तपासण्याची जबाबदारी सेलिब्रिटींसह प्रत्येक जाहिरातदाराची असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

ADVERTISEMENT

tukaram mundhe warning on misleading advertisements
tukaram mundhe warning on misleading advertisements
Google CTA

बातम्या हायलाइट

point

'कायदा सर्वांना समान',

point

चुकीच्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींना तुकाराम मुंढेंचा इशारा

tukaram mundhe warning on misleading advertisements : अन्नभेसळ आणि ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित मुद्द्यांवर बोलताना अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर कठोर भूमिका जाहीर केली आहे. मुंबई Tak ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, चुकीच्या किंवा भ्रामक जाहिराती करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली जाणार असून, त्यात मोठे सेलिब्रिटी असोत किंवा इतर कोणीही, कायद्यासमोर सर्व समान आहेत. कायद्यात कोणालाही विशेष सवलत नसून चुकीची जाहिरात केल्यास संबंधित व्यक्तीवर निश्चितपणे कारवाई होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : "1 किलो पनीरसाठी 5-6 लीटर दूध लागतं; मग 200 रुपयांमध्ये पनीर कसं मिळतं?"

"ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या जाहिराती रोखण्यासाठी पावले उचरणार"

मुंढे यांनी सांगितले की, अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाच्या (FSSAI) केंद्रीय सल्लागार समितीच्या बैठकीत दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर अधिक कठोर अंमलबजावणी करण्याबाबत चर्चा झाली आहे. या बैठकीत देशातील सर्व राज्यांचे अन्न आयुक्त उपस्थित होते. ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या जाहिराती रोखण्यासाठी आता अधिक कडक पावले उचलण्याचा निर्णय झाला असून त्याची अंमलबजावणी सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे कोणतेही उत्पादन प्रसिद्ध करण्यापूर्वी ते FSSAI च्या नियमांनुसार आहे की नाही, याची खात्री करणे ही जाहिरातदाराचीही जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : दुधातील भेसळ कशी ओळखाल? काय पाहायचं? तुकाराम मुंढेंचा महत्त्वाचा सल्ला

हे वाचलं का?