दहावीच्या विद्यार्थिनीवर कॅफेत लैंगिक अत्याचार, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी
Crime News : बारावीच्या विद्यार्थ्याने शाळेतील दहावीच्या विद्यार्थिनीला कॅफेत नेऊन लैंगिक अत्याचार केला. आरोपीने प्रेम आणि मैत्रीचे आमिष दाखवून तिच्यासोबत अश्लील कृत्य केले. नंतर तिचे व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद केले. संबंधित व्हिडिओच्या आधारे ब्लॅकमेल करून आरोपीने मित्रासोबत देखील शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती केली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पीडितेवर अत्याचार करत अश्लील व्हिडिओ केले रेकॉर्ड
व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी
Crime News : एका बारावीच्या विद्यार्थ्याने शाळेतील दहावीच्या विद्यार्थिनीला कॅफेत नेऊन लैंगिक अत्याचार केला. आरोपीने प्रेम आणि मैत्रीचे आमिष दाखवून तिच्यासोबत अश्लील कृत्य केले. नंतर तिचे व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद केले. संबंधित व्हिडिओच्या आधारे ब्लॅकमेल करून आरोपीने मित्रासोबत देखील शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती केली. अशातच पीडितेविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील बिजनौर येथील असून घटनेनं परिसर हादरून गेला आहे.
हे ही वाचा : Devendra Fadanvis : '48 हजार कोटी रूपयांपर्यंतचे शेतकऱ्यांचे बिल माफ', मुख्यमंत्र्यांची घोषणा
पीडितेवर अत्याचार करत अश्लील व्हिडिओ केले रेकॉर्ड
घडलेल्या घटनेत आरोपीची फरहान अशी ओळख समोर आली. फरहान हा 12 वीचा विद्यार्थी आहे. हळू हळू आरोपीने फरहानने पीडितेशी मैत्री केली, नंतर प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला फिरण्याच्या बहाण्याने 17 मे 2025 रोजी पीडितेला कॅफेत घेऊन गेला. तिथे त्याने पीडितेवर अत्याचार केला, नंतर तिचे अश्लील व्हिडिओ काढण्यात आले.
व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी
या कृत्यानंतर आरोपी फरहानने व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देखील दिली होती. पीडितेला त्याच्या मित्रावर दुसऱ्यांचा शरीरसंबंध ठेवण्याची जबरदस्ती केली होती. व्हिडिओ समोर येताच, हारिस नावाच्या आरोपीच्या मित्राने पीडितेवर जबरदस्ती केली होती. या घटनेनंतर कंटाळून पीडितेनं घडलेला सर्व प्रकार कुटुंबीयांना सांगितला.
हे ही वाचा : शरद पवार घड्याळ आतल्या बाजूने का घालतात? अंकशास्रज्ञाने सांगितलं लॉजिक
पीडितेनं सांगितलेली घटना कुटुंबीयांनी ऐकून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. तिला पोलीस ठाण्यात नेले आणि तिने घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. नजीबाबादच्या पोलीस कॉन्स्टेबल आकांक्षा गौतम यांनी सांगितलं की, पीडितेच्या आजोबांच्या तक्रारीच्या आधारे आरोपी विद्यार्थी फरहान आणि त्याचा मित्र हारिस यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी प्रकरणाचा तपास करत सखोल कारवाई केली.










