शरद पवार घड्याळ आतल्या बाजूने का घालतात? अंकशास्रज्ञाने सांगितलं लॉजिक

मुंबई तक

Sharad Pawar : अंकशास्त्राकडे केवळ भारतातीलच नाही,तर जगातील लोकांचा कल असल्याचे पाहिले आहे. अशातच नुकत्याच झालेल्या मुंबई तक बैठकमध्ये अंकशास्त्र या विषयावर डॉ. नवनीत मानधनी यांनी भाष्य केलंय, एवढंच नसून त्यांनी पुढे राष्ट्रीय नेते आणि खासदार शरद पवार हे घड्याळ आतल्या बाजूने का घालतात यामागील लॉजिक सांगितलं आहे. 

ADVERTISEMENT

Sharad Pawar
Sharad Pawar
Google CTA

बातम्या हायलाइट

point

शरद पवार हे घड्याळ आतल्या बाजूने का घालतात?

point

डॉ. नवनीत मानधनींनी सांगितलं कारण

Sharad Pawar : अंकशास्त्राकडे केवळ भारतातीलच नाही,तर जगातील लोकांचा कल आहे. अशातच नुकत्याच झालेल्या मुंबई तक बैठकमध्ये अंकशास्त्र या विषयावर डॉ. नवनीत मानधनी यांनी भाष्य केलंय, एवढंच नसून त्यांनी पुढे राष्ट्रीय नेते आणि खासदार शरद पवार हे घड्याळ आतल्या बाजूने का घालतात यामागील लॉजिक सांगितलं आहे. 

हे ही वाचा : पालघरमध्ये खाकी वर्दीला बट्टा, 56 वर्षीय पोलिसाचा 13 वर्षीय मुलीवर विनयभंग

शरद पवार हे घड्याळ आतल्या बाजूने का घालतात?

जे लोक घड्याळ मनगटाच्या आतील बाजूला घालतात, त्याचं कारण त्यांना कामाप्रती किंवा त्यांच्या वैयक्तिक बाबतीतलं नियोजन कोणालाही कळू नये, असं आहे. त्यांना आपले प्लान हे लपवूनच ठेवायचे असतात, शदर पवार आणि नरेंद्र मोदी यांचं बहुतेकदा घड्याळ हे आतील बाजूलाच असतं, असं ते म्हणाले.  

4 मूलांकाबाबत डॉ. नवनीत मानधनी काय म्हणाले? 

पुढे त्यांनी सांगितलं की, "ज्यांचा 4 क्रमांक आहे त्यांच्या आयुष्यातील कष्ट संपत नाही. त्यांना नवनवीन काम करावं लागतं आणि नवीन ध्येयाचा सामना करावा लागतो. मात्र, 4 क्रमांक असलेली व्यक्ती ही मित्र असावी, कारण या व्यक्तीने अनेक गोष्टी अनुभवलेल्या असतात". 

"शॉर्टकट उत्तर केवळ हेच लोक सांगू शकतात. 4 या तारखेला अजितदादा, देवेंद्र फडणवीस, अमित शहा यांचा मूलांक हा 4 आहे. या मूलांकाचं 9 मूलांक असलेल्या व्यक्तींशी कधीही पटणार नाही," असं त्यांनी सांगितलं. यांच्या पत्नीची संसारात महत्त्वाची भूमिका असते. 

हे वाचलं का?