प्रेमासाठी धाडस केलं, पण फसला; प्रेयसीच्या घरात अकरावीच्या विद्यार्थ्यासोबत काय घडलं?

मुंबई तक

11 वीत शिकणारा एक विद्यार्थी त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला. अचानक प्रेयसीची आई त्यांच्या रुममध्ये आली आणि एक भयंकर घटना घडली. ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमधील ही घटना आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

प्रेमासाठी धाडस केलं, पण फसला;

point

प्रेयसीच्या घरात अकरावीच्या विद्यार्थ्यासोबत काय घडलं?

Crime News : ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमधून एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. येथील लक्ष्मीसागर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका बहुमजली इमारतीमध्ये 11 वीत शिकणाऱ्या एका 17 वर्षीय विद्यार्थ्याचा 10 व्या मजल्यावरून खाली पडल्याने मृत्यू झाला. प्राथमिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार, हा विद्यार्थी त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला होता. मात्र, त्याच वेळी मुलीची आई अचानक घरी आल्याने घाबरलेल्या विद्यार्थ्याने स्वतःला लपवण्याचा प्रयत्न केला, पण हाच प्रयत्न त्याच्या जीवावर बेतला.

प्रेयसीला भेटायला गेला अन्...

रफान खुर्शीद असे या मृत विद्यार्थ्याचे नाव असून, तो भुवनेश्वरमधील एका नामांकित खाजगी शाळेत शिक्षण घेत होता. त्याचे वडील एका खाजगी बँकेत रिलेशनशिप मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. घटनेच्या दिवशी रफान आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या फ्लॅटवर गेला होता, तेव्हा ती मुलगी घरी एकटीच होती. काही वेळातच मुलीची आई अचानक घरी पोहोचली. आईला पाहताच रफान प्रचंड घाबरला आणि पकडले जाण्याच्या भीतीने त्याने सुरुवातीला बाथरूममध्ये आश्रय घेतला.

हे ही वाचा : आदित्य ठाकरे, रोहित पवार की श्रीकांत शिंदे राज्याचा तरुण मुख्यमंत्री कोण होईल? अंकशास्त्रज्ञांनी दिलं उत्तर

10 व्या मजल्यावरुन पडून मृत्यू

बाथरूममध्येही सुरक्षित न वाटल्याने त्याने तिथून बाहेर पडून स्वतःला लपवण्याचा एक धोकादायक मार्ग निवडला. तो बाथरूमच्या खिडकीतून बाहेर पडला आणि इमारतीच्या डक्ट यार्डमध्ये असलेल्या पाईपला पकडून लटकला. साधारण 10 व्या मजल्याच्या उंचीवर तो केवळ पाईपच्या आधारे काही मिनिटे लटकून राहिला होता. परंतु, काही वेळातच त्याचा हातावरील ताबा सुटला आणि संतुलन बिघडल्याने तो थेट खाली कोसळला. एवढ्या उंचावरून खाली पडल्यामुळे रफानचा जागीच मृत्यू झाला, ज्यामुळे संपूर्ण अपार्टमेंट परिसरात प्रचंड खळबळ माजली.

हे ही वाचा : आधी पवार शिंदेंना भेटले, आता रात्री पाटील 'नंदनवन'वर.. 45 मिनिटांची बैठक अन् चक्रावणारं राजकारण

अपघात की घातपात?

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी भुवनेश्वरच्या कॅपिटल हॉस्पिटलमध्ये पाठवला. पोलिसांनी अपार्टमेंटमधील सीसीटीव्ही फुटेज जप्त केले असून, त्या आधारे संपूर्ण घटनेचा क्रम जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी सध्या 'आकस्मिक मृत्यू' म्हणून नोंद केली असून मुलीची आणि तिच्या कुटुंबीयांचीही चौकशी करण्यात येत आहे. हा केवळ एक अपघात आहे की यामागे इतर काही कारण आहे, याचा शोध पोलीस घेत असून शवविच्छेदन आणि फॉरेन्सिक अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.

हे वाचलं का?