Govt Jobs : BSNL मध्ये भरती जाहीर, 2 लाख रुपयांहून अधिक पगार, 'हे' आहेत निकष

मुंबई तक

BSNL मध्ये उच्च पदावर काम करण्याची संधी चालून आली आहे. यासाठी भरती प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. यासाठी पात्रतेचे निकष काय असणार आहेत, जाणून घेऊया.

ADVERTISEMENT

Government Jobs
Government Jobs
google news

बातम्या हायलाइट

point

Govt Jobs : BSNL मध्ये भरती जाहीर

point

2 लाख रुपयांहून अधिक पगार

point

'हे' आहेत निकष

Government Jobs : BSNL मध्ये फायनान्स आणि अकाउंट्स विभागामध्ये 'जनरल मॅनेजर' (General Manager) पदांसाठी अधिकृत भरती जाहीर केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 15 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. कॉर्पोरेट क्षेत्रातील आणि वित्त क्षेत्रातील अनुभवी उमेदवारांसाठी उच्च पदावर काम करण्याची ही एक उत्तम संधी आहे. या भरतीबाबतची सविस्तर अधिसूचना बीएसएनएलच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता आणि वेतन

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे चार्टर्ड अकाउंटंट (CA), कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट (CMA), एमबीए (फायनान्स), किंवा फायनान्स मधील पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा (PG Diploma in Management - Finance) यांपैकी कोणतीही एक शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. याशिवाय, उमेदवाराचे वय कमाल 50 वर्षांपेक्षा जास्त नसावे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 2,25,000 रुपये इतके आकर्षक वेतन दिले जाणार आहे.

हे ही वाचा : सोलापूर विधानपरिषद : गोरे म्हणाले विरोधकांकडे 16 मतंही नाहीत, आता धैर्यशील मोहितेंचं जोरदार प्रत्युत्तर

अनुभवाची अट काय?

शैक्षणिक पात्रतेसोबतच उमेदवारांकडे फायनान्स आणि अकाउंट्स क्षेत्रात एक्झिक्युटिव्ह किंवा मॅनेजमेंट ग्रेडमध्ये किमान 15 वर्षांचा कामाचा अनुभव असणे अनिवार्य आहे. यामध्ये किमान 5 वर्षे डीजीएम (DGM) किंवा त्यावरील वरिष्ठ कार्यकारी/मॅनेजर स्तरावर काम केलेले असावे. हा अनुभव प्रामुख्याने लिस्टेड कंपन्या किंवा मागील 3 वर्षांची सरासरी उलाढाल 3000 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक असलेल्या नामांकित कंपन्यांमधील असावा, ज्याचे ऑडिट केलेले आर्थिक पत्रक किंवा विश्वसनीय कागदोपत्री पुरावे सादर करणे आवश्यक आहे.

हे ही वाचा : मुंबईची खबर : मुंबईकरांना पहिल्यांदा मिळणार 'ही' गोष्ट, जाणून घ्या सविस्तर

कधी सुरु होणार अर्ज?

या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना केवळ ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज करता येणार आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला दिनांक 9 जून पासून सुरुवात होत असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 जून अशी आहे. उमेदवारांनी आपले अर्ज बीएसएनएलच्या bsnl.co.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन सादर करायचे आहेत. मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
 

हे वाचलं का?